शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: लोकसभेची पुनरावृत्ती कागलमध्ये करूया, जयंत पाटील यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 15:02 IST

'नवा इतिहास घडविण्यासाठी सज्ज राहा'

कागल : शाहू - फुले - आंबेडकर यांचे विचार सोडून काही लोक जातात तेव्हा त्यांच्या विरोधात बहुजन समाज कसा एकवटतो, हे छत्रपती शाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरने दाखवले आहे. आता लोकसभेचीच पुनरावृत्ती येत्या नोव्हेंबर महिन्यात कागलमध्ये होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. समरजित घाटगे यांचा हा पक्ष प्रवेश महाराष्ट्र विधानसभेचे चित्र बदलणारा ठरेल, नवा इतिहास घडविण्यासाठी सज्ज राहा, असेही आमदार पाटील म्हणाले.पक्ष प्रवेशाबद्दल भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आ. पाटील हे तातडीने मुंबईहून कागलला आले. यावेळी प्रवीणसिह घाटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आर. के. पोवार, अनिल घाटगे, वीरकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. येत्या तीन सप्टेंबरला शरद पवार हे पक्ष प्रवेशासाठी स्वतः कागलमध्ये येत असल्याचे आ. पाटील यांनी जाहीर केले. समरजित घाटगे म्हणाले, २०१९मध्ये पराभव होणार हे माहीत असूनही २०२४च्या विजयासाठी लढलो आहे. आज या मतदारसंघातील सर्व नेते एका बाजुला आहेत. त्यामुळे मला शरद पवार यांची आणि पक्षाची ताकद लागणार आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांचेही भाषण झाले. स्वागत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी, तर सुनील मगदुम यांनी आभार मानले.

टप्प्यात आल्यावर लगेचच कार्यक्रमवस्तादाने एक डाव शिल्लक ठेवलेला असतो. त्याची प्रचिती कागलमध्ये आणूया. समरजित घाटगे यांचा फोन आला. भेटीची वेळ कधी देता म्हणाले. तेव्हा उद्या - परवा कशाला, आजच येतो. म्हणून तातडीने आलो. टप्प्यात आल्यावर आम्ही लगेच कार्यक्रम करतो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस