शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बाळूमामा देवस्थानने दीड कोटी मोजून खरेदी केलेली जमीन कागदोपत्री, प्रत्यक्षात जागा गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:27 IST

जमीन पाहण्याचीही घेतली नाही तसदी, संशयास्पद व्यवहारावर सोयीस्कर डोळेझाक

शिवाजी सावंतगारगोटी : आदमापूर (ता.भुदरगड) येथील भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या संत बाळूमामा देवस्थानजवळची गट क्रमांक १९१ मधील १२९ गुंठे जमीन देवस्थान समितीचे सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्या नावावर घेतली. या क्षेत्रातील १०६ गुंठे जमीन अदलाबदल करण्यात आली. उर्वरित २३ गुंठे जमीन कोणकेरी यांच्या नावावर शिल्लक राहिली. त्यांनी ती जमीन वटमुखत्यारपत्राने मुरगूड येथील प्रकाश पांडुरंग मांगले यांना दिली. त्यांनी ती जमीन १ कोटी ६८ लाखांना पुन्हा देवस्थानला दिली पण प्रत्यक्षात जागेवर केवळ दोन गुंठेदेखील जमीन शिल्लक नाही. मग समितीच्या कार्याध्यक्ष किंवा इतर विश्वस्तांनी ती जमीन पाहण्याची तसदी का घेतली नाही अशी विचारणा होवू लागली आहे.बाळूमामा मंदिराच्या जवळ असणारी ही जमीन आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी या जमिनीची गरज होती म्हणून ती विकत घेतली असेल तर त्याबध्दल कुणाचे दुमत नाही. परंतू ही खासगी मालकांकडून जमीन विकत घेताना पुरेसा पारदर्शक व्यवहार झालेला नाही. देवस्थानच्या नावे थेट जमीन न घेता सचिवांच्या नावे घेतल्याने त्यात गैरव्यवहारास संधी राहिली आहे.कागदोपत्री २३ गुंठे जमीन व्यवहारास दिसत असली तर जाग्यावर मात्र एवढी जमीन शिल्लक नाही. दोन गुंठेच जमीन जाग्यावर असल्याचे दिसते. त्यामुळे हा व्यवहार करताना जमीन तरी तेवढी शिल्लक आहे का हे पाहणे गरजेचे होते. परंतू तसे घडलेले नाही. विश्वस्त मंडळाने सरकारी किंवा खासगी मोजणी आणून ही जागा नक्की किती आहे याची तपासणी करणे आवश्यक होते परंतू त्याकडे कानाडोळा केला आहे.

वाचा : 'बाळूमामा'ची दीड कोटींची २३ गुंठे जमीन पुन्हा देवस्थानलाच विकली; आदमापुरातील विश्वस्तांचा व्यवहार पुन्हा चर्चेतभक्तांना सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या नावाखाली जमिनी खरेदी करताना वटमुखत्यारपत्राचा आधार घेतला आहे. कोट्यवधींची जमीन खरेदी करताना कोणत्याही जमीन मालकाचा थेट देवस्थान समितीशी व्यवहार न होऊ देता तो मध्यस्थांमार्फत व्यवहार केल्याने सर्वच व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेशासह देशाच्या अनेक राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेले संत बाळूमामा हे गोरगरिब आणि कष्टकरी जनतेचे दैवत आहे. रोज हजारो आणि दर अमावस्येला लाखो भक्त या संतांच्या दर्शनासाठी हजेरी लावतात त्यामुळे मंदिराच्या परिसरात पार्किंग,भक्तनिवास,स्वच्छतागृह यासारख्या सुविधा देण्यासाठी जमिनींची आवश्यकता भासत आहे.नेमका याच संधीचा फायदा घेऊन काही विश्वस्तांनी कारभाऱ्यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांचा ढपला पाडण्याचे महापाप केले आहे.

कार्याध्यक्षांकडून प्रतिसाद नाहीबाळूमामा देवस्थान समितीची बाजू समजून घेण्यासाठी लोकमतने समितीचे कार्याध्यक्ष शामराव होडगे यांच्याशी अनेकदा संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Balumama Temple Land Deal: Millions Paid, Land Missing On Ground

Web Summary : Balumama Devasthan in Admapur bought land for devotees, but discrepancies arose. Land purchased in secretary's name, then resold to the temple. Despite paying crores, the actual land available is significantly less, raising concerns about transparency and potential corruption within the trust.