शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर!, लाडक्या बहिणींचा हप्ता आज जमा होणार, मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:37 IST

रायगड, नाशिक जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद म्हणजे सर्वस्व नाही

कोल्हापूर : विरोधक लाडकी बहीण योजना बंद होणार, अशी अफवा पसरवित आहे. मात्र महायुती सरकार कडून सुरु असलेली ही योजना कधीही बंद होणार नाही. जुलै महिन्याची रक्कम रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज, शुक्रवार सायंकाळपर्यंत जमा होणार आहे. त्याचे कामही सुरु झाले आहे, अशी माहिती महिला, बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी दिली. मंत्री तटकरे कोल्हापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.

रायगड, नाशिक जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद म्हणजे सर्वस्व नाही. यासंबंधी तसेच विकास निधी संबंधी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे घेतील. महायुतीमध्ये चांगला समन्वय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आदिती म्हणाल्या, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासंदर्भात योग्य वेळी निर्णय होईल. पालकमंत्रिपद नसल्यामुळे विकास निधी संदर्भातील कोणताही अन्याय होणार नाही. चांगल्या समन्वयामुळे महायुतीतर्फे निधी दिला जात आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री म्हणून काम करत आहे. पालकमंत्री हे एक पद आहे, सर्वस्व नाही.

आदिशक्ती अभियान सुरू करणारआदिशक्ती अभियानांतर्गत प्रत्येक गावात आदिशक्ती समिती स्थापन केली जाणार आहेत. त्यात महिला प्रमुख असतील. हुंडाबंदी, हुंडाबळी, महिला अत्याचारासह राज्य सरकारच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. तसेच ८ मार्चला महिलांची विशेष ग्रामसभाही भरविली जाणार असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.