शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: इचलकरंजीत पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला काळे फासले, पोलिस-आंदोलनकर्त्यांत झटापट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 14:27 IST

अतुल आंबी इचलकरंजी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी ...

अतुल आंबी

इचलकरंजी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने इचलकरंजीत आंदोलन सुरु होते. या आंदोलना दरम्यान, एस.टी.वर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले. यावेळी पोलिस आणि आंदोलनकर्ते यांच्यात झटापट झाली. त्यामुळे प्रांत कार्यालय चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काळे फासण्याचा प्रकार कोल्हापूर नाका, नदीवेस नाका, प्रांत कार्यालय चौक येथे घडला.आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार गावोगावी आता राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यापुर्वीच १४ गावांनी नेत्यांना गावबंदी केली आहे. दरम्यानच जिल्हात ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.

वडगावातही काळे फासलेवडगाव येथे २५ गावातील गावकऱ्यांनी एकत्र येऊन पालिका चौकात साखळी उपोषण सुरु केले आहे. या आंदोलना दरम्यान, एस.टी.वर जाहिरात केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले.

नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळणार; मनोज जरांगेंनाही CM शिंदेंचं आवाहन

आरक्षणाबाबत सरकार गांभीर्य आहे. २ मार्गाने आपण मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. त्यात जुन्या कुणबी नोंदी आणि रद्द झालेल्या मूळ आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलीय. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी युद्ध पातळीवर काम करतंय. मनोज जरांगे पाटील यांनी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे, मराठा समाजासाठी त्यांनी जो लढा उभारला आहे तो सरकारने गांभीर्याने घेतला आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना आवाहन केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणprime ministerपंतप्रधानChief Ministerमुख्यमंत्री