शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- मडिलगे खून प्रकरण: आई कुणा म्हणू मी..; आई गेली देवाघरी, बापाची जेलवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:36 IST

शीतल मोरे, समीर देशपांडे कोल्हापूर : आजरा तालुक्यातील मडिलगे गावातील सुशांत आणि पूजा गुरव या दाम्पत्याच्या पोटी दीड वर्षापूर्वी ...

शीतल मोरे, समीर देशपांडेकोल्हापूर : आजरा तालुक्यातील मडिलगे गावातील सुशांत आणि पूजा गुरव या दाम्पत्याच्या पोटी दीड वर्षापूर्वी ही दोन्ही जुळी बाळं जन्माला आली. सुशांत कीर्तनकार, प्रवचनही करायचा. त्यामुळे त्यांनी नावंही ठेवली सोपान आणि मुक्ताई. परंतु कर्ज फेडण्यासाठी पूजाने आपले दागिने देण्यास नकार दिला आणि यातूनच सुशांतने तिचा खून केला. एका घावात हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आणि ‘आई कुणा म्हणू मी’ अशी विचारण्याची दुर्दैवी वेळ सोपान, मुक्ताई यांच्यावर आली.त्या दोन कोवळ्या जीवांना आपल्या आईला नेमकं काय झालंय हे कळलंही नाही. पत्नीचा खून करून दोन्ही बाळांना घेऊन दरोड्याचा बनाव करणाऱ्या सुशातचं काळीज कसं द्रवलं नाही. पहाटे ही घटना घडल्यापासून घरातच असलेल्या या दोन्ही पाखरांना रात्री सुशांतची आत्या चंदगड तालुक्यातील पुंद्रा गावी घेऊन गेली. आज मंगळवारी तिसऱ्या दिवसासाठी या दोघांना मडिलगे येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न मोठा आहे. आई देवाघरी आणि बापाला जेलची वारी. अशात या दाेन चिमुकल्यांचा सांभाळ करायचा कोणी आणि कसा.

..अन् पतीनेच केला पत्नीचा खून, मडिलगेतील दरोड्याच्या बनावाचे कसं फुटलं बिंग.. वाचाआयटीआय झालेला सुशांत कोल्हापुरात नोकरीला होता. ती नोकरी सोडली. संताजी घोरपडे कारखान्यात नोकरीला लावण्यात आले. तीही नोकरी सोडली. मग आचाऱ्याचा व्यवसाय सुरू केला. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील पूजाशी त्याचा विवाह झाला. आई कॅन्सरने आजारी. तीदेखील सध्या त्याच्यासोबत नव्हती.

वाचा -  महाराज.. हे काय केलं तुम्ही!, मडिलगेतील खुनाच्या उलगड्यानंतर पंचक्रोशी झाली सुन्न

कर्जबाजारी झालेल्या सुशांतने शांत डोक्याने पत्नीचा खून केला आणि या दोन चिमुकल्यांना आईच्या मायेपासून पारखं केलं. गावात सुशांतची बहीण आहे. अतिग्रे येथे सासुरवाडी आहे. पुंद्राला वडिलांची बहीण आहे. पण आयुष्यभरासाठी या दोन बाळांची जबाबदारी घेणार कोण, असा प्रश्न आता गुरव यांच्या भावकीला पडला आहे.चिमुकल्यांना आधार आत्याचाच..!सुशांतची एकुलती बहीण कोमल गावातच असते. तिच्या कुटुंबाची परिस्थितीही बेताचीच आहे; परंतु या घटनेमुळे वयोवृद्ध, आजारी आईसह दीड वर्षाच्या भाच्यांना तिचाच आधार उरला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस