शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कोल्हापूरच्या विमानतळाचा ऐतिहासिक लूक, आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 12:22 IST

कोल्हापूर : प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते रोज आपल्या एक्स अकाउंटवरून वेगवेगळ्या विषयांवर ...

कोल्हापूर: प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते रोज आपल्या एक्स अकाउंटवरून वेगवेगळ्या विषयांवर पोस्ट करत असतात. कधी देशातील गंभीर समस्या तर कधी एखादा चांगला व्हिडीओ शेअर करत त्याचे कौतुक करत असतात. इतकेच काय पण एखाद्याचा बालहट्टही पुरवतात आणि आर्थिक मदतही पुरवतात. आताही त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी कोल्हापूरच्याविमानतळाच्या नव्या इमारतीला ऐतिहासिक आणि आर्किटेक्चरल लूक दिल्याबद्दल इमारतीचे दोन फोटोंसह कौतुक केले आहे.कोल्हापूरचे विमानतळ म्हणजे, स्टील, काच आणि सिमेंटवर आधारित फक्त केवळ सांगाडा नाही तर स्थानिक इतिहास आणि स्थापत्यकलेवर आधारित अनोखी ओळख देण्याचे काम केले आहे. या सरकारच्या दृष्टीचा मी आदर करतो, असे कौतुक आनंद महिंद्रा यांनी केले आहे. इंडियन टेक्नॉलॉजी ॲन्ड इन्फ्राच्या सोशल मीडियावरील कोल्हापूरच्या विमानतळाच्या लूकवरील पोस्टवर त्यांनी हे रिट्विट केले आहे.

कोल्हापूरच्या विमानतळाच्या इमारतीची पाहणी मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच केली. या इमारतीचे लवकरच लोकार्पण होणार आहे. भिंतींवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य चित्रमय व व्हिडीओ स्वरूपात लावले आहेत. पर्यटकांसाठी स्थानिक संस्कृती, गडकिल्ले यांची माहिती देणारे व्हिडीओ वॉल, वस्तूंचे प्रदर्शन, स्थानिक चित्रकारांनी तयार केलेले ताराराणी यांचे चित्र आणि इतर कलाकृतींचा समावेश आहे. याशिवाय मराठ्यांचा इतिहास आणि संस्कृती, मराठा इतिहासातील वाडा पद्धतीच्या काळ्या दगडातील वास्तू दगडी बांधकामात, मशाली लावलेल्या स्वरूपात किल्ल्यांप्रमाणे हे विमानतळ सजलेले आहे. यासंदर्भातील फोटो एक्स अकाउंटवरून पोस्ट केल्याने ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळAnand Mahindraआनंद महिंद्रा