गडहिंग्लज : तीन आठवड्यांपूर्वी गडहिंग्लजला बाजाराला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या महिलेचा शिर नसलेला मृतदेह महागाव येथील ओढ्याच्या पात्रात सापडला. त्यामुळे तिचा घातपात झाला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. सुनीता संजय केसरकर (वय ४०, रा.भडगाव, ता.गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.पोलिस आणि ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, भडगाव येथील संजय केसरकर हे ऊसतोडणीच्या मजुरीचे काम करतात. त्यांच्या पत्नी सुनीता याही बांधकामाच्या कामावर मजुरीला जात होत्या. रविवार (१८ जानेवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्या घरातून निघून गेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्या बेपत्ता झाल्याची वर्दी मुलगा लक्ष्मीकांत याने पोलिसात दिली होती.बुधवारी (११ फेब्रुवारी) महागाव-मासेवाडीच्या दरम्यान घंटीचा झरा नावच्या ओढ्याच्या पात्रात मुंडके नसलेला आणि उजव्या पायाची हाडे दिसत असलेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. महागावचे पोलिस पाटील प्रदीप कांबळे यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलिसात मृताची नोंद झाली. पोलिस उपनिरीक्षक हणमंत नाईक, महिला पोलिस कॉन्स्टेबल अंजली पाटील यांच्यासह फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. सुनीता यांच्यापश्चात पत्नी, दोन मुलगे, सासू, सासरे असा परिवार आहे.चप्पल, साडी, बांगड्यावरून ओळख पटलीमृतदेहानजीक सापडलेली चप्पल, अंगावरील साडी, बांगड्या व हातातील काळादोरा यावरून तो मृतदेह सुनीता यांचाच असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह नातेवाइकांकडे सुपुर्द केला.सुनीता यांच्याकडे मोबाइल होता. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी नातेवाइकांनी मोबाइलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता, असे नातेवाइकांनी सांगितले.मोबाइल कुठे गेला?सुनीता यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तूंवरूनच त्यांची ओळख पटली, परंतु घटनास्थळी त्यांचा मोबाइल सापडला नाही. त्यामुळे तो मोबाइल कुठे गेला? त्यावर कुणा-कुणाचा संपर्क झाला होता? मोबाइलचे शेवटचे लोकेशन कोणते? याचा तपास पोलिस करीत आहेत.छडा लावण्याचे पाेलिसांसमाेर माेठे आव्हानमृतदेहावर मुंडके नव्हते, उजव्या पायाची हाडे दिसत होती. शरीरापासून तिचे मुंडकेच कसे वेगळे झाले? याची चर्चा घटनास्थळी होती. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
Web Summary : Sunita Kesarkar, missing for weeks after leaving for the market, was found dead in a stream near Mahagaon. Her headless body suggests foul play. Police investigate the missing mobile phone to uncover details.
Web Summary : बाजार जाने के बाद लापता सुनीता केसरकर का शव महागांव के पास एक नाले में मिला। उनका सिर कटा हुआ था, जिससे हत्या का संदेह है। पुलिस मोबाइल फोन की जांच कर रही है।