शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

कोल्हापूर परिक्षेत्रात गुन्ह्याचा आलेख स्थिर, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 12:36 IST

आर्थिक फसवणुकीचे आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रात गुन्ह्याचा आलेख स्थिर आहे. ऊसतोड टोळ्यांतील मुकादम, ठेकेदार, आर्थिक फसवणुकीचे आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. दाखल गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याचे आदेशही परिक्षेत्रातील पोलिस ठाण्यांना दिले आहेत, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.महानिरीक्षक फुलारी म्हणाले, कोल्हापूर परिक्षेत्रात गुन्ह्याचा आलेख स्थिर आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात फसवणुकीचे गुन्हे अधिक आहेत. ही संख्या सुमारे १२०० इतकी आहेत. ऊसतोड टोळ्यांतील मुकादम ठेेकेदारांवर गुन्हे दाखल आहेत. आर्थिक फसवणुकीसह कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात वाढ आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये गुन्ह्यांची दाखल संख्या १७ हजार होती. २०२३-२४ मध्ये ही संख्या १६ हजार ५०० इतकी आहे.मालमत्ताविषयक गुन्ह्यांत वाढ झाली आहे. जबरी चोरी ५८ टक्के, घरफोडी २७ टक्के आणि इतर चोरीचे प्रमाण २२ टक्के इतके आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिलअखेर खुनाचे २२ गुन्हे दाखल असून २१ गुन्हे उघडकीस आणले आहेत. नागरिकांच्या तक्रारी थेट दाखल करून घेण्याचा उपक्रम प्रत्येक पोलिस ठाण्यात सुरू आहे. त्यांचा तत्काळ छडा लावण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाईअल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळत आहेत. त्यांच्या पालकांवर कारवाई करण्याचे स्थानिक पोलिसांना आदेश दिले आहे. प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने येत्या काही दिवसांत संयुक्तपणे कारवाई होईल.

बांगलादेशी नागरिक चौकशी सुरूकोल्हापुरात नागदेववाडी परिसरात दोन बांगलादेशी महिलांना दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून आक्षेपार्ह असलेले साहित्य जप्त केले आहे. त्यांनी आधार कार्ड, पॅनकार्ड आणि अन्य साहित्य सांगली येथून तयार केले आहे. त्यासंदर्भात आवश्यक ती सर्व चौकशी करण्याचे संबंधित तहसील कार्यालयाला दिले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी निष्पन्न झाले आहेत.

अतिजलद न्यायालयासाठी प्रयत्नसांगली येथील गर्भलिंग प्रकरणात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गर्भपात प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्याचे काम सुरू आहे. सरकारी वकिलांसोबत चर्चा करून प्रकरण अतिजलद न्यायालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस