शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ladki Bahin Yojana: 'त्या' सर्व महिलांचे अर्ज बाद; महिला बाल विकासकडे चौकशीसाठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:30 IST

लाडकी कोण कसं ठरवणार ?

कोल्हापूर : ज्या कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, त्या सर्व महिलांचा लाभ शासनाने बंद केला आहे. या महिलांची तेलही गेले तूपही गेले, अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे चौकशीसाठी महिलांची गर्दी वाढली आहे. पुढील १५ दिवसांत सगळ्या बोगस लाडक्या बहिणींचे अर्ज मोठ्या प्रमाणात बाद होणार असून, त्यासाठी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू झाली आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा ताप निस्तरताना शासनाच्या नाकी नऊ येत आहेत. निकषात बसत नसलेल्या महिलांनी एवढेच काय पुरुषांनीदेखील या योजनेचा लाभ घेतला आहे. असे सगळे बोगस लाभार्थी शोधण्याचे काम शासन स्तरावर सुरू आहे.एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, असा निकष होता पण सासू, सुना, लेकी अशा सगळ्यांनीच लाभाचे पैसे घेतले आहेत. अशा कुटुंबातील सर्वच महिलांचे अर्ज शासनाने बाद ठरवले असून, त्यांचा लाभ बंद केला आहे. पूर्वी तर लाभ व्यवस्थित मिळत होता, आता का बंद झाला, अशी विचारणा करण्यासाठी लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने कसबा बावड्यातील जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे जात आहेत.दुसरीकडे अंगणवाडीसेविकांमार्फत महिलांनी अर्ज करताना दिलेल्या कागदपत्रांची, तसेच गृहभेटीद्वारे माहिती घेतली जात आहे. पुढील १० ते १५ दिवसात सगळ्या बाबी स्पष्ट होऊन निकषात न बसणाऱ्या महिलांची नावे बाद केली जाणार आहेत.

लाडकी कोण कसं ठरवणार ?एकाच कुटुंबातील २ पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल नेमक्या कोणत्या महिलेचा अर्ज बाद करायचा हा मोठा प्रश्नच आहे. सासू, सुना लेकी यापैकी एकीचा अर्ज बाद केला तर भांडणाला कारण होणार आहे. घराघरात भांडणे होतीलच पण माझाच अर्ज का बाद केला म्हणून महिला कार्यालयाला जाब विचारायचा येणार. तो तापच नको म्हणून सगळ्याच महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. पुढे कदाचित त्या कुटुंबातील दुसऱ्या महिलेचे ना हरकत पत्र घेऊनच अन्य महिलेला लाभ मंजूर करतील.