शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केला, वडिलांनी अपहरण करून जावयाला बेदम चोपला; तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:10 IST

तरुणाची मिरजेतून सुटका, चौघांचा शोध सुरू

कोल्हापूर : इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीतून मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या वडिलांनी जावयाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. ११) सकाळी विशाल मोहन आडसूळ (वय २६, रा. भुये, ता. करवीर) याची मिरजेतून सुटका केली. रविवारी (दि. ९) रात्री सव्वानऊच्या सुमारास भुयेवाडी कमानीपासून त्याचे अपहरण झाले होते.याप्रकरणी मुलीचे वडील श्रीकृष्ण महादेव कोकरे (वय ४५, रा. वाघमोडेनगर, कुपवाड, ता. मिरज) याच्यासह धीरज ऊर्फ हणमंत नामदेव पाटील (५६, रा. कवठेपिरान, ता. मिरज, जि. सांगली) आणि राजेंद्र परमेश्वर कट्टीमणी (३३, रा. कुपवाड एमआयडीसी, सांगली) यांना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यातील आणखी चौघांचा शोध सुरू आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री विशाल आडसूळ याचे चार ते पाच जणांनी भुयेवाडी कमानीपासून अपहरण केल्याची फिर्याद करवीर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन करवीर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनेही या गुन्ह्याचा तपास सुरू केला. मिरजेतील बेदाणा व्यापारी श्रीकृष्ण कोकरे याने साथीदारांच्या मदतीने विशालचे अपहरण केल्याची माहिती कॉन्स्टेबल रामचंद्र कोळी यांना मिळाली.त्यानुसार पथकाने मिरजेत जाऊन कोकरे याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने विशालचे अपहरण करून त्याला मिरज न्यायालयाच्या मागे असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये डांबून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने जाऊन बंद फ्लॅटमधून विशालची सुटका केली. अपहरणकर्त्यांनी बेदम मारहाण करून हातपाय बांधून त्याला डांबले होते. गुन्ह्यातील कार, दुचाकी आणि मोबाइल असा साडेचार लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.आंतरजातीय लग्नाचा रागविशाल आणि श्रृती या दोघांची वर्षभरापूर्वी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्री आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. सात महिन्यांपूर्वी त्यांनी पळून जाऊन जोतिबा डोंगर येथे लग्न केले. याचा राग मुलीचे वडील कोकरे यांना होता. याच रागातून त्यांनी जावयाचे अपहरण केले.

अनर्थ टळलापोलिसांनी वेळीच विशालचा शोध घेऊन त्याची सुखरूप सुटका केली. एखादा दिवस उशीर झाला असता तर त्याच्या जिवाचे बरेवाईट झाले असते. जिवे मारण्याच्या उद्देशानेच त्याचे अपहरण केल्याची कबुली अटकेतील संशयितांनी दिली. दीड महिन्यापूर्वी एकदा त्यांनी अपहरणाचा प्रयत्न केला होता.

पाळत ठेवून अपहरणजावयाचे अपहरण करण्यासाठी कोकरे याने मित्रांना पैसे दिले होते. संशयितांनी आठवडाभर त्याच्यावर पाळत ठेवून माहिती काढली. त्यानंतर रविवारी रात्री भुयेवाडी कमानीजवळ कारमध्ये घालून त्याचे अपहरण केले. जातानाच हातपाय बांधून त्याला मारहाण केली होती. पळून जाऊन लग्न केल्यानंतर तो पत्नीसह भुयेवाडी येथे राहत होता. त्याचे कुटुंबीय निगवे दुमाला (ता. करवीर) येथे राहतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस