Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 11:04 IST2026-04-13T11:03:23+5:302026-04-13T11:04:12+5:30

विद्यापीठ हायस्कूलमध्ये शिक्षण : हलाखीच्या परिस्थितीतही जगल्या सप्तसुरांचे जीवनगाणे

The first salutation of the queen of music, Asha Bhosle, is to Ambabai.. the second to Saraswati. | Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला

Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर: ते साल अंदाजे १९४२ असावे. वडिलांच्या निधनांतर कुटुंबाच्या पालकत्त्वाची जबाबदारी आली ती सर्वांत मोठी बहीण दिवंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर. त्यांचे हात धरून आशा भोसले या विद्यापीठ हायस्कूलची पायरी चढल्या. 

घरी अठराविश्व दारिद्र्य असल्याने डबाही आणायची सोय नव्हती. मधल्या सुट्टीत चार आण्याचे चुरमुरे, फुटाणे यावच्यार आणि अंबाबाई मंदिराच्या रामाचा पार येथे बसून खायच्या. आपली ही परिस्थिती २०१० साली विद्यार्थ्यांसमोर मांडतानाही आशाताई भावनाविवश झाल्या होत्या. कोल्हापूरला आल्या की, त्यांचा पहिला नमस्कार अंबाबाईला आणि दुसरा सरस्वतीला म्हणजेच विद्यापीठ हायस्कूलला असायचा. त्याकाळी मंगेशकर कुटुंब मिरजकर तिकटी येथील दैवज्ञ बोर्डिंगसमोर असलेल्या कारेकर यांच्याकडे भाड्याने राहायचे. 

कौटुंबिक जबाबदारीमुळे लता मंगेशकर शिकू शकल्या नाहीत. पण, त्यांनी लिहिलेल्या आठवणीत आशा, उषा, मीना या भावंडांच्या हाताला धरून विद्यापीठ हायस्कूलमध्ये सोडून यायच्या असा उल्लेख आहे. त्यावेळी आशा भोसले या साधारण तिसरी ते पाचवी अशी तीन वर्षे लता मंगेशकर यांचे गाण्यात करिअर विद्यापीठ हायस्कूलमध्ये शिकल्या. पुढे सुरू झाल्याने त्यांनी कोल्हापूर सोडले. पण, विद्यापीठ हायस्कूलच्या आठवणी कायम त्यांच्या मनात रुंजी घालत होत्या. आशा भोसले कोल्हापुरात ९ फेब्रुवारी २०१० रोजी आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी विद्यापीठ हायस्कूलला भेट दिली व आपल्या तिसरीच्या वर्गात जाऊन बसल्या. मराठीच्या पुस्तकात त्यांच्यावर आधारित सप्तसुरांचे जीवनगाणे हा धडा होता. त्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना त्या कोणत्या परिस्थितीत वाढल्या, हे सांगितले होते.

तब्बल वीस गाणी गायली...

विद्यापीठ हायस्कूलच्या भेटीदरम्यान त्यांनी मी गाणे गाणार नाही, अशी अट ठेवली > होती. पण, विद्यार्थ्यांचा आग्रह मोडवेना... हे माझे छोटे मित्र आहेत, त्यांना नाही कसं म्हणू, असे म्हणत त्यांनी कोणत्याही साथसंगतीशिवाय तब्बल २० गाणी गायली. शेवटची चार गाणी तर बंगाली, कानडी अशा विविध भाषांमध्ये गायली होती.
 

Web Title : आशा भोसले का पहला नमस्कार अंबाबाई को, दूसरा सरस्वती को।

Web Summary : आशा भोसले का कोल्हापुर से नाता संघर्ष, स्कूल और अंबाबाई के आशीर्वाद से जुड़ा था। उन्होंने अपने स्कूल के दिनों को याद किया और छात्रों के लिए 20 गाने गाए।

Web Title : Asha Bhosle's first respects to Ambabai, second to Saraswati (school).

Web Summary : Asha Bhosle's connection to Kolhapur included struggles, school, and Ambabai's blessings. She fondly remembered her school days and sang 20 songs for students.