शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

यू-ट्युबवरून माहिती मिळवून तयार केल्या बनावट नोटा, मशीन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 12:35 IST

झटपट पैसे कमविण्याच्या नादात घुलेसह त्याचा मित्र वडरही पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

गडहिंग्लज : महागाव येथे सापडलेल्या बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली मशीन गडहिंग्लज पोलिसांनी जप्त केली. यातील मुख्य सूत्रधार अब्दुलरजाक आब्बासाहेब मकानदार (वय २५, रा. एकसंबा रोड, मेहबूबनगर, चिक्कोडी), अनिकेत शंकर हुले (२०, रा. महागाव, ता. गडहिंग्लज), संजय आनंदा वंडर (३५, सध्या रा. शिक्षक कॉलनी नेसरी मूळगाव महागाव) यांना सोमवार (२९) अखेर पोलीस कोठडी मिळाली आहे.पोलिसांनी सांगितले की, पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांना महागाव येथील पाच रस्ता चौकात दोघे जण बनावट नोटा खपविण्यासाठी येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला होता.शनिवारी (दि-२७) दुपारी चिक्कोडीहून गडहिंग्लजमार्गे महागावला आलेल्या मकानदार याने पाच रस्ता चौकात थांबलेल्या घुले व वडर यांची भेट घेतली. त्यांच्या हालचालीवरून संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोटरसायकली सह ५००, २०० व १०० रुपयांच्या १ लाख ८८ हजार ६०० रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या.दरम्यान, मकानदार याने आपणच बनावट नोटा तयार केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या चिक्कोडी येथील राहत्या घरात बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरलेला प्रिंटर, शाई व कागद पोलिसांनी जप्त केले आहेत. रविवारी (२८) येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे अधिक तपास करीत आहेत.यू-ट्युबवरून नोटांची नक्कल !मकानदार हा सेंट्रिगबरोबरच देवदेवतांचे फोटो व ताईत बनवून देत होता. त्यातूनच घुले व त्याची ओळख झाली. दरम्यान, मकानदारने यू-ट्युबवरून माहिती मिळवून महिनाभरात सुमारे २ लाखांच्या हुबेहूब नोटा तयार केल्या होत्या. त्या 'नोटा' खपवण्यासाठी भरपूर कमिशन देण्याचे आमिष घुलेला दाखविले होते. यातूनच झटपट पैसे कमविण्याच्या नादात घुलेसह त्याचा मित्र वडरही पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस