शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

कोल्हापुरात नवीन राजवाड्यातील दरबार हॉलने ७९ वर्षांनी अनुभवला राज्याभिषेकाचा सोहळा

By भारत चव्हाण | Updated: June 6, 2025 13:13 IST

यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते मंत्रोच्चारात शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर सुवर्ण अभिषेक करण्यात आला

भारत चव्हाणकोल्हापूर : फुलांच्या माळांची सजावट, रांगोळ्यांनी सजलेला परिसर, भालदार-चोपदारांची लगबग, राजपरिवारासह मानकऱ्यांची उपस्थिती, सनई  चौघड्यांचे मंजूळ स्वर, शाहीरी पोवाड्यांच्या कवनांनी चेतवलेली स्फुर्ती, मराठा लाईट इनफन्ट्रीच्या सिल्व्हर वाद्यवृंदाचे लयबद्ध सादरीकरण  आणि मंत्रोच्चाराचा जयघोष अशा आवेशपूर्ण वातावरणात शुक्रवारी नवीन राजवाड्याच्या ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये शिवराज्याभिषेक दिनाचा शाही सोहळा पार पाडला.छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट व शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट, कोल्हापूर यांनी ३५१ व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन केले.  हा सोहळा नवीन राजवाड्यासमोरील प्रांगणात होत असतो, परंतू गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे हा सोहळा ऐनवेळी ऐतिहासिक दरबार हॉल मध्ये घेण्यात आला. या दरबार हॉलमध्ये शेवटचा राज्याभिषेक १९४६ मध्ये छत्रपती शहाजी महाराज यांचा झाला होता. त्यानंतर तब्बल ७९ वर्षांनी दरबार हॉलने राज्याभिषक दिनाचा सोहळा अनुभवला. त्याचे साक्षीदार होण्याचा मान करवीरकरांनी मिळाला. रंगीबेरंगी रांगोळ्या, फुलांच्या माळा यांनी दरबार हॉलमध्ये सजावट करण्यात आली होती. सकाळी साडेसात वाजल्यापसून सनई चौघड्यांचे मंजुळ स्वरांनी वातावरण मंगलमय करुन टाकले. मान्यवरांचे आगमन होईल तसे मराठा लाईट इनफन्ट्रीच्या सिल्व्हर वाद्यवृंदाचे सादरीकरण सुरु झाले. खासदार शाहू छत्रपती, महाराणी याज्ञसेनीराजे छत्रपती, महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांचे  दरबार हॉलमध्ये आगमन होताच उपस्थितांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले तर मराठा लाईट इनफन्ट्रीच्या सिल्व्हर वाद्यवृंदाने त्यांना मानवंदना दिली. राजपरिवारासह मान्यवर स्थानापन्न झाल्यानंतर शाहीर विशारद आझाद नायकवडी, मराठा लाईट इनफन्ट्रीच्या सिल्व्हर वाद्यवृंदाचे सादरीकरण, तसेच छत्रपती शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समूह गीत सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची सुवर्णमूर्ती मिरवणुकीने समारंभस्थळी आणली. यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते मंत्रोच्चारात शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर सुवर्ण अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूजा, आरती पार पडली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने झालेल्या जयघोषाने दरबार हॉल दणाणून गेला.याप्रसंगी आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी,पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, ज्येष्ठ  इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इंद्रजित सावंत, विजयराव देवणे, तेज घाटगे, जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख यांच्यासह नील बावडेकर, रणजितसिंह चव्हाण  हिंमतबहाद्दर, बाळ पाटणकर, प्रदुम्नराजे खर्डेकर, निवृत्त कर्नल विजयसिंह  गायकवाड, ऋतुराज इंगळे, शिवराज  गायकवाड, देवस्थानचे ट्रस्टी ॲड. राजेंद्र चव्हाण, प्रनील इंगळे, विनायकराव घोरपडे माद्याळकर, विश्वजित घाटगे केनवडेकर यांच्या समाजातील  मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivrajyabhishekशिवराज्याभिषेकShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती