शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: धक्कादायक! सीपीआरमध्ये मृत अर्भकाचे कुत्र्यांनी तोडले लचके, घटनेने उडाली खळबळ 

By उद्धव गोडसे | Updated: April 20, 2023 12:40 IST

मृत अर्भकाचे अवशेष ताब्यात घेऊन हे सीपीआरच्या आवारात कोणी टाकले, याचा शोध पोलिसांनी सुरू केला.

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय म्हणजेच सीपीआरमध्ये पीएम रुमच्या शेजारी असलेल्या शेडमध्ये भटक्या कुत्र्यांनी मृत अर्भकाचे लचके तोडले. हा प्रकार गुरुवारी (दि. २०) सकाळी निदर्शनास आल्यानंतर सीपीआरमध्ये एकच खळबळ उडाली. मृत अर्भक कोणी आणून टाकले, की सीपीआरमधील कर्मचा-यांच्या दुर्लक्षामुळे कुत्र्यांनी वैद्यकीय कच-यातून ओढून आणले याचा शोध पोलिस आणि सीपीआरमधील अधिका-यांकडून सुरू आहे.सीपीआरमध्ये रोज ३०० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येतात. प्रसूती विभागातही रुग्णांची मोठी गर्दी असते. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास पीएम रुमच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आणि बाजूच्या रिकाच्या जागेत भटक्या कुत्र्यांकडून मृत अर्भकाचे लचके तोडले जात होते. हा प्रकार काही नागरिकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती सीपीआरमधील कर्मचा-यांना दिली. घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसही सीपीआरमध्ये पोहोचले. मृत अर्भकाचे अवशेष ताब्यात घेऊन हे सीपीआरच्या आवारात कोणी टाकले, याचा शोध पोलिसांनी सुरू केला.सीपीआरच्या वैद्यकीय कच-यातून कुत्र्यांनी मृत अर्भक ओढून आणले असावे, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. असे असेल तर मृत अर्भक कच-यात कोणी टाकले, कच-यापर्यंत भटकी कुत्री कशी पोहोचतात, याची चौकशी सीपीआरमधील अधिका-यांनी सुरू केली आहे. या घटनेने सीपीआरमधील कारभार चव्हाट्यावर आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस