शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

Kolhapur: नुकसानभरपाईच्या कात्रीत अंबाबाई विकास आराखडा, जोतिबा आराखड्याचे काम सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:13 IST

कन्सल्टंटची नियुक्ती

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर बाह्य परिसरातील भूसंपादनापोटी बाधितांना नुकसानभरपाई कशी व कोणत्या स्वरूपात द्यायची, यावर अजून चर्चा सुरू असल्याने मंदिराच्या विकास आराखड्याला अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. नुकसानभरपाईचे स्वरूप ठरविण्यावर शासनस्तरावर बैठका होत आहेत. ते ठरताच आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. दुसरीकडे जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी पुरातत्व खात्याच्या सल्ल्यानुसार कन्सल्टंटची नियुक्ती करून आराखड्याचे अंदाजपत्रक बनवण्याचे काम सुरू आहे.मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अंबाबाईच्या १४७० कोटींच्या व जोतिबा मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील २९० कोटींच्या विकास आराखड्यांना मान्यता देण्यात आली. त्यानंतर २ जून रोजी जोतिबा विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, अंबाबाई विकास आराखड्याची मान्यता रखडली. अंबाबाई मंदिराच्या अंतर्गत व बाह्य परिसरातही भूसंपादन करावे लागणार आहे. तिथे रहिवासी, कुळ आणि दुकाने अशी संमिश्र लोकवस्ती आहे. सातशेहून अधिक मिळकतदार आहेत. भूसंपादन करताना या सर्व बाधितांना नुकसानभरपाई कोणत्या स्वरूपात द्यायची, रक्कम द्यावी की पर्यायी जागा द्यावी की, टीडीआर स्वरूपात काही करता येईल, याबाबत शासन पातळीवर चर्चाविनिमय सुरू आहे. नुकसानभरपाईचे स्वरूप ठरताच अंबाबाई मंदिराच्या आराखड्यालाही प्रशासकीय मान्यता देण्यात येईल.

जोतिबा आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता देवस्थान समितीकडून पुरातत्व खात्याच्या निर्देशानुसार कन्सल्टंटची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही नियुक्ती होताच आराखड्याचे अंदाजपत्रक काढण्यात येईल. त्यानंतर शासनाकडून निधी येईल त्याप्रमाणे कामे सुरू होतील. अंबाबाई आराखड्यातील भूसंपादनाच्या नुकसानभरपाईचे स्वरूप ठरताच कार्यवाही केली जाईल. - अमोल येडगे, जिल्हाधिकारी तथा प्रशासक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती