शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर खुद्द नारायण राणेंचे उत्तर, म्हणाले- "जर माझ्या पदाचा..."
2
"युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी..."; प्रताप सरनाईकांचा आरोप
3
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला, खिडक्यांची तोडफोड, एकाला अटक!
4
आमदारांनी लावली कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?; 'सेटलमेंट-अ‍ॅडजस्टमेंट'चे राजकारण
5
आंध्र प्रदेशात ONGC पाइपलाइनमधून गॅसगळतीनंतर भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण
6
मीरा भाईंदरमध्ये आठवडा होत आला तरीही उमेदवारांची शपथपत्रेच 'अपलोड' केलेली नाहीत
7
भाजप निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतंय का? बिनविरोध निवडीवरून नाना पटोलेंचा घणाघात!
8
‘५ लाख द्या, नाहीतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करेन’, ड्रायव्हरची मालकिणीला धमकी, त्यानंतर...  
9
नवनीत राणांनी अजित पवारांना दिलेल्या 'त्या' सल्ल्यावर खोडके बरसले; म्हणाले 'औकातीत राहून बोलायला शिका'
10
व्हेनेझुएलावर अचानक हल्ला करून अमेरिकेचा चीन-रशियाला मोठा इशारा; भारतावर काय होणार परिणाम?
11
छाप्यानंतर सुरू व्हायचा 'खेळ', CGST डेप्युटी कमिशनर प्रभा भंडारीच्या घरीच व्हायची 'ती' डील
12
'जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत लाडक्या बहिणींचा निधी बंद होणार नाही'- देवेंद्र फडणवीस
13
मणिपूर हादरले! पहाटेच्या वेळी तीन शक्तिशाली IED स्फोट, सुरक्षा यंत्रणांनाही धक्का, दोन जखमी
14
"फटाके फोडणारे देशद्रोही आहेत, भारतात फटाक्यांवर बंदी घाला"; भाजपा नेत्या मनेका गांधी भडकल्या
15
व्हेनेझुएलावर झालेल्या हल्ल्यादरम्यान आमचे ३२ नागरिक मारले गेले, या देशाचा अमेरिकेवर आरोप
16
सावधान! तोतया पोलीस अधिकारी आणि कुरिअरचा सापळा; ८१ वर्षीय व्यावसायिकाला ७ कोटींचा चुना
17
"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?
18
निकोलस मादुरो या भारतीय बाबाचे आहेत भक्त; त्यांच्या कार्यालयातील भींतीवरही भला मोठा फोटो
19
"सर लवकर या, माझ्या वडिलांना हे मारून टाकतील"; बाप-लेकाला भररस्त्यात अमानुष मारहाण
20
"इतिहास सांगेल गद्दार कोण!" निकोलस मादुरो यांचा मुलगा संतापला, अमेरिकेला दिलं चॅलेंज!
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत महायुती विरुद्ध शिव-शाहू आघाडीतच सामना, ६५ जागांसाठी २३० उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:39 IST

शिंदेसेना १, राष्ट्रवादी १ यांच्यासह १० अधिकृत पक्षांच्या उमेदवारांची माघार, काही प्रभागांत मैत्रीपूर्णच्या नावाखाली बहुरंगी लढती

इचलकरंजी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या १५३ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. काहींनी अवघे चार मिनिटे शिल्लक राहिल्यानंतर अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेईपर्यंत काही उमेदवारांची धाकधूक वाढली होती. बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरलेल्या भाजपच्या २२ उमेदवारांचे मन वळविण्यात पक्षाला यश आले. निवडणूक रिंगणात २३० उमेदवार राहिले असून, माघारीनंतर महायुती आणि शिव-शाहू आघाडीमध्ये दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या. गेल्या दोन दिवसांपासून अपक्षांची मनधरणी करण्याचे काम सुरू होते. त्याला यश आले. अनेक अपक्षांनी शुक्रवारी माघार घेतली. उमेदवारी न दिल्याने नाराज होऊन उमेदवारी दाखल केलेल्या भाजपच्या बहुतांशी उमेदवारांचे मन वळविण्यात यश आले. त्यातील नाराज २२ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

वाचा : कोल्हापुरात सर्वत्रच बहुरंगी लढती; ८१ जागांसाठी ३२५ उमेदवार रिंगणातभाजपच्या अश्विनी कुबडगे यांनी अवघे तीन ते चार मिनिटे बाकी असताना आपला अर्ज मागे घेतला. मागे घेणाऱ्या शहरातील प्रमुखांमध्ये बाळकृष्ण तोतला, इकबाल कलावंत, नागेश पाटील, आदींचा समावेश आहे. शिंदेसेनेचे उमा महादेव गौड, राष्ट्रवादीचे इचलकरंजी शहर कार्याध्यक्ष अमित गाताडे, युवा महाराष्ट्र सेनेचे सोहेल पटेल, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुनीता विनोद आवळे, संगीता निर्मळे, वर्षा कांबळे, बादल सलीम शेख, संध्या मोहन बनसोडे, आरपीआय आठवले गटाच्या रोहिणी गेजगे यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली.उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. अपक्ष वगळता आजच्या माघारीनंतर महायुती व शिव-शाहू विकास आघाडीमध्ये दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. काही ठिकाणी एकास एक लढत होणार आहे, तर काही प्रभागांतील जागेमध्ये एकापेक्षा जादा उमेदवार असणार आहेत.

आमदारांनी गाठले घरभाजपमध्ये विविध पदांवर काम करणारे आणि उमेदवारीवर हक्क असलेल्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली होती. शुक्रवारी शेवटच्या दिवशी आमदार राहुल आवाडे अनेकांच्या घरी जाऊन, तर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी फोनवरून चर्चा करून त्यांना मागे घेण्यास सांगितले.स्वीकृतची बंपर ऑफरभाजपकडून ज्या उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यातील अनेकांना स्वीकृत नगरसेवक करण्याची ऑफर देण्यात आली. स्वीकृत नगरसेवकाची ऑफर दिल्याचे माघारीनंतर अनेक उमेदवारांनी सांगितले.शहापूर केंद्र ठरले चर्चेतएका राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या एका उमेदवाराने शुक्रवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी शहापूर येथील प्रभाग समिती कार्यालयाजवळ शेवटच्या क्षणाला माघार घेण्यासाठी आला होता. परंतु त्याठिकाणी त्याचे वडील आणि भाऊ यांनी त्याला अडवून धरत माघार घ्यायची नाही, अशी भूमिका घेतली. या चर्चेत वेळ निघून गेली. त्याचबरोबर अनेक अपक्षांना काही उमेदवारांनी आपल्या मोटारीतून माघारीसाठी घेऊन आले. त्यांची लगबग त्या केंद्रावर चर्चेची ठरली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Election: MahaYuti vs. Shiv-Shahu Alliance, 230 Candidates in Fray

Web Summary : Ichalkaranji municipal elections witness a two-way fight between MahaYuti and Shiv-Shahu alliance after 153 withdrawals. BJP successfully persuaded 22 rebels to withdraw nominations, simplifying the contest. Accepted corporator positions were offered to some candidates to encourage withdrawal.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती