कोल्हापूर : महापालिकेच्या फुलेवाडी येथील फायर स्टेशन क्रमांक पाचच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने पुन्हा एकदा महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन मजली इमारतीचे ४९ लाख रुपयांचे हे काम कोल्हापुरातील रेणुका कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. २०२४ मध्ये या कामासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. तीन महिन्यांपूर्वी ठेकेदार शशिकांत पवार यांनी हे काम सुरू केले होते. सोमवारपासून स्लॅबचे काम हाती घेण्यात आले. मंगळवारी प्रत्यक्ष स्लॅब टाकतानाच तो कोसळल्याने या कामाच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
वाचा- कोल्हापूर महापालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशनच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळला; १ ठार, ५ जखमी
लिफ्टचा धक्का बसून एखादा नवा स्लॅब एका क्षणात कसा काय कोसळू शकतो. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कामाचा दर्जा तपासला नव्हता का, असे असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत.अधिकारी म्हणाले, आम्ही दर्जा तपासलाआम्ही दरराेज या कामाची तपासणी करत होतो. मंगळवारीही कामाचा दर्जा, वापरलेले साहित्य याची तपासणी केली होती असे स्पष्टीकरण उपशहर अभियंता सुरेश पाटील यांनी ही घटना घडल्यानंतर दिले. मात्र, एका छोट्याशा यंत्राचा धक्का लागून इतका मोठा स्लॅब कोसळतो कसा, असा सवाल उपस्थित झाला आहे.
Web Summary : Kolhapur's Phulewadi fire station's new slab collapsed, raising concerns about construction quality. The 4.9 million rupee project, awarded to Renuka Construction, saw the slab collapse during placement, despite claims of daily quality checks by officials. Questions arise about the structural integrity.
Web Summary : कोल्हापुर के फुलेवाड़ी फायर स्टेशन का नया स्लैब गिर गया, जिससे निर्माण गुणवत्ता पर चिंता जताई गई। रेणुका कंस्ट्रक्शन को दिए गए 49 लाख रुपये के प्रोजेक्ट में स्लैब डालते समय ही वह गिर गया, जबकि अधिकारियों ने रोजाना गुणवत्ता जांच का दावा किया। संरचनात्मक अखंडता पर सवाल उठे।