कोल्हापूर: 'टस्कर' कडून कारचा चक्काचूर, परिसरात भीतीचे वातावरण; आजऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 18:21 IST2022-06-17T18:08:41+5:302022-06-17T18:21:32+5:30
कार पलटी करुन पायाने तुडविल्यामुळे मोठे नुकसान झाले

कोल्हापूर: 'टस्कर' कडून कारचा चक्काचूर, परिसरात भीतीचे वातावरण; आजऱ्यातील घटना
आजरा : कासार कांडगाव (ता. आजरा) येथे टस्कर हत्तीने नारायण देसाई यांची चारचाकी गाडी उलटून टाकून चक्काचूर केली. टस्करने सोंडेने कार पलटी केली अन् पायाने तुडविल्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले.
चाफवडेच्या जंगलातून टस्कर थेट कासार कांडगावच्या जंगलात आज पहाटे गेला. महाविद्यालयात मोटरसायकलवरुन येणाऱ्या युवकांनी सकाळी ७.३० वाजता टस्कर रस्त्यावरून जाताना पाहिला. तत्पूर्वी टस्करने मारुती हरेर यांच्या उसाचे तर नारायण देसाई यांच्या शेतातील घरासमोर लावलेल्या चार चाकी गाडीचे नुकसान केले.
याबाबतची माहिती मिळताच वनपाल संजय निळकंठ, वनरक्षक मारुती कांबळे, वनसेवक शंकर डवरी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, परिसरात टस्करच्या वावरामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले.