शहरं
Join us  
Trending Stories
1
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
2
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
3
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
4
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
5
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
6
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
7
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
8
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
9
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
10
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
11
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
12
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
13
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
14
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
15
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
16
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
17
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
18
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश
19
भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
20
७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी

Kolhapur: सीपीआर रुग्णालयातील अपघात विभागात पाणीच पाणी, रुग्णांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:36 IST

कोल्हापूर : जिल्ह्याचा थोरला शासकीय दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) इमारतींची दयनीय अवस्था मंगळवारी कोसळलेल्या पावसाने ...

कोल्हापूर : जिल्ह्याचा थोरला शासकीय दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) इमारतींची दयनीय अवस्था मंगळवारी कोसळलेल्या पावसाने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या पावसामुळे येथील गोदावरी इमारतीमधील अपघात विभागात पाणीचपाणी झाल्याने रुग्णांना अक्षरश: पाण्यात उभे राहून उपचार घेण्याची वेळ आली. येथील बेडवर पाणी साचल्याने रुग्णांचे अतोनात हाल झाले. डॉक्टर व कर्मचाऱ्यांनाही पाण्यात उभे राहूनच काम करावे लागले.सध्या सीपीआरच्या नूतनीकरणाचे काम सुुरू असल्याने अपघात विभागास येथील पोलिस चौकी गोदावरी इमारतीत स्थलांतरित केली आहे. मंगळवारी रात्री पाऊस पडल्याने इमारतीला गळती लागून अपघात विभागात पाणीच पाणी झाले. रुग्णांना दुसरीकडे तत्काळ हलवणे शक्य नसल्याने पाण्यात उभे राहूनच त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आली. विशेष म्हणजे, या इमारतीमधील स्लॅब गळत असल्याने रुग्णांच्या बेडवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही रुग्णांना रक्तस्राव झाल्याने तो थांबवण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्न केले जात असताना गळतीमुळे त्यात वारंवार अडथळे आले.

पोलिस चौकीचे बनले तळेसीपीआरमधील पोलिस चौकीही गोदावरी इमारतीत आहे. पावसाच्या पाण्याने या चौकीचे तळे बनले होते. त्यामुळे नोंदी घेतानाही संबंधित पोलिसांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली. रजिस्टर पाण्यात भिजत असल्याने नोंदी घेणेही अवघड झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयWaterपाणी