'तो' अश्लील व्हिडिओ फेकचं; पत्नीने केलेला पतीच्या सहकारी महिलेचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 19:50 IST2023-07-23T19:49:47+5:302023-07-23T19:50:43+5:30
चंदगड : शिनोळी येथील एका नामांकित कंपनीच्या कामगाराने महिला कामगाराला आंबोली दर्शन घडवत तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ कामगाराच्या ...

'तो' अश्लील व्हिडिओ फेकचं; पत्नीने केलेला पतीच्या सहकारी महिलेचा व्हिडीओ व्हायरल
चंदगड : शिनोळी येथील एका नामांकित कंपनीच्या कामगाराने महिला कामगाराला आंबोली दर्शन घडवत तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ कामगाराच्या पत्नीने व्हायरल केल्याच्या अफवा आहेत. केवळ बदनामीसाठीच तो व्हायरल केला असून तो फेक असल्याचा निर्वाळा पत्नीनेच दिला आहे.
नामांकित कंपनी प्रशासनाचा डोळ्यात धूळफेक करत काही कामगार हे महिला कामगारांशी लगट करत असल्याच्या तक्रारी होत असल्याने याबाबत प्रशासनाने ही कंपनीतील एका कामगारांने शिनोळीजवळील एका गावातील मुलीला आंबोलीला नेऊन तिच्याशी अश्लील चाळे करून त्याचा व्हिडिओ केला होता. तो व्हिडिओच कामगाराच्या पत्नीला सापडल्याने तिने तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या अफवा पसरवून तो बदनामीसाठी केला असून त्यामध्ये काही तथ्य नसल्याचे सदर पत्नीनेच सांगितले आहे.