उत्तरकार्य बाराव्याऐवजी सातव्या दिवशी पोर्ले तर्फ ठाणे गावचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:00 IST2018-04-21T00:00:35+5:302018-04-21T00:00:35+5:30
पोर्ले तर्फ ठाणे : माणसांच्या मरणोत्तर होणाऱ्या विधीला समाज प्रबोधनाची जोड मिळत असल्याने या प्रक्रियेतील प्रथांना फाटा मिळत आहे. त्यापैकी मूठभर रक्षा नदीत, दशविधीवेळी भांडी वाटपाची परंपरा सर्वत्र बंद केली आहे

उत्तरकार्य बाराव्याऐवजी सातव्या दिवशी पोर्ले तर्फ ठाणे गावचा उपक्रम
पोर्ले तर्फ ठाणे : माणसांच्या मरणोत्तर होणाऱ्या विधीला समाज प्रबोधनाची जोड मिळत असल्याने या प्रक्रियेतील प्रथांना फाटा मिळत आहे. त्यापैकी मूठभर रक्षा नदीत, दशविधीवेळी भांडी वाटपाची परंपरा सर्वत्र बंद केली आहे. पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथे रक्षाविसर्जन तिसºया दिवशी, तर बाराव्या दिवशी केला जाणारा दुखवटा सातव्या दिवशी घेण्याचा पायंडा गावात राबविला जात
आहे.
माणसांच्या मरणोत्तर रक्षाविसर्जन, खवर करणे, दशविधी, आदी प्रक्रिया विधिवत पार पाडण्यासाठी एक चौकट ठरलेली असायची. या प्रक्रियेत अमावास्या, पौर्णिमेशिवाय आणखी अडथळा निर्माण करणार दिवस आला तर या विधी मागेपुढे घेताना दुखवट्याच्या कुटुंबात मॅरेथॉन चर्चा रंगायची. त्यानंतर मरणोत्तर प्रक्रिया पूर्ण व्हायची; परंतु यातील काही प्रथांमध्ये समाजमान्यतेनुसार बदल घडवून त्याला समाज प्रबोधनाची जोड मिळाल्याने जे काही निर्णय झाले त्याला विरोध झाला नाही, हेच या संघटित भूमिकेचे यश आहे. पाणी प्रदूषणाबाबतची जनजागृती म्हणून रक्षाविसर्जन नदीच्या पाण्यात करण्याऐवजी मूठभर रक्षा नदीच्या पाण्यात सोडायची आणि उर्वरित रक्षा शेतात विसर्जित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रक्षाविसर्जनादिवशी अशुभ दिवस आला तर शुभ दिवस ठरवून रक्षाविसर्जन केले जायचे. गावातील ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन, मरणोत्तर येणाºया तिसºया दिवशी कोणताही मानला जाणारा अशुभ दिवस आला तरी रक्षाविसर्जन तिसºया
दिवशीच करण्याचा ठाम
निर्णय घेण्यात आला.
पूर्वी दळणवळणाच्या सोयी नसल्यामुळे उत्तरकार्य बाराव्या दिवशी केले जात होते; परंतु आधुनिक युगात दळणवळणाच्या व संपर्क माध्यमांच्या सोयी जलद उपल्बध होत असल्याने नातेवाइकांपर्यंत माहिती पोहोचविणे सोपे झाले आहे.
त्यामुळेच बाराव्या दिवशी होणारे उत्तरकार्य पोर्लेत सातव्या दिवशी घेण्याचा पायंडा गेल्या काही महिन्यांपासून राबवून इतर गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
रक्षादानचा उपक्रम
मरणोत्तर मूठभर रक्षा नदीच्या पाण्यात व उर्वरित रक्षा शेतात मिसळली जाते; पण ज्यांचे स्वत:च्या मालकीचे शेत नाही, त्यांनी आपली रक्षा झाडे लावण्यासाठी देऊन ‘त्या’ व्यक्तीच्या स्मृती झाडाच्या रूपाने जागविल्या जातील. ते झाड जगविण्याची हमी देणारे जनजागृती डिजिटल फलक पन्हाळा तालुक्यातील प्रत्येक गावातील स्माशानशेडमध्ये लावण्याचा उपक्रम निसर्गमित्र दिनकर चौगुले यांनी राबविला आहे.
पोर्ले गावात मरणोत्तर प्रक्रियेत मरण पावलेल्या व्यक्तीची स्मृती जागविण्यासाठी भेटवस्तू वाटप करण्याची प्रथा होती. अर्थिकदृष्ट्या न परवडणाºया प्रथाही बंद करून सामान्य व गरीब कुटुंबांना यामुळे आर्थिक दिलासा मिळाला आहे.