शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

Maharashtra Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरे यांनी जनतेसमोर मांडला तोंडी जाहीरनामाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 6:06 PM

दुष्काळ मुक्त, बेरोजगार मुक्त, प्रदुषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शिवसेनेला निवडून द्या असे आवाहन आदीत्य ठाकरे यांनी शिरोली येथील छ. संभाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या जाहीर सभेत केले. सुरुवातीला आदीत्य ठाकरे यांचे स्वागत शिवसेनेचे  माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे यांनी केले.   

ठळक मुद्देआदित्य ठाकरे यांनी जनतेसमोर मांडला तोंडी जाहीरनामाच शिरोली येथील जाहीर सभेत प्रदुषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आवाहन

शिरोली  शेतकऱ्यांचा सातबरा कोरा करून बळीराजाला कर्जमुक्त करायचे आहे. भुकेलेल्या लोकांना दहा रूपयात पोटभर जेवण द्यायच आहे, असा तोंडी जाहीरनामाच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी जनतेसमोर मांडला.

दुष्काळ मुक्त, बेरोजगार मुक्त, प्रदुषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शिवसेनेला निवडून द्या असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी शिरोली येथील छ. संभाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या जाहीर सभेत केले. सुरुवातीला आदित्य ठाकरे यांचे स्वागत शिवसेनेचे  माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे यांनी केले.   

यावेळी ठाकरे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आहे त्यासाठी जनतेची मदत मला मदत हवी आहे. महाराष्ट्रात आज ही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात मोठे उद्योग आणून तरूणांना रोजगार उपलब्ध करून द्यायच स्वप्न आहे. प्रदुषण मुक्त महाराष्ट्र करायचा आहे. ज्या प्रमाणे मुंबईत मल्टी स्पेशालीटी रूग्णालये आहेत, तशीच रूग्णालये कोल्हापुरातही उभा करायची आहेत. या रूग्णालयात गोरगरीब जनतेला कमी पैशात उपचार घेता येईल.आपला विजय झालेला आहे पण गाफील राहायचे नाही कागल ,गडहिंग्लज ला जाऊन आलो आहे. तेथे ही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. साडेपाच हजार किलोमीटर फिरून गेलो, सगळ्या मतदारसंघात जाऊन साडेपाच हजार किलोमीटर फिरून अभ्यास केला आहे. माझ्यावर महाराष्ट्राने विश्वास दाखवून जनतेने अडचणी समोर येऊन सांगितल्या आहेत.ठाकरे म्हणाले, पूरपरिस्थिती ही शिवसेनेने चांगले काम केले आहे. विधानभवनावर भगवा फडकण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना  निवडून द्या असे आवाहन आदित्य  ठाकरे यांनी सभेत केले.यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांची भाषणे झाली.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरेkolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाShiv Senaशिवसेना