टीईटी परीक्षा : कोल्हापुरात अनेक केंद्रावर गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 11:27 IST2021-11-21T11:26:24+5:302021-11-21T11:27:03+5:30

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे घेण्यात येत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) आज, रविवारी पेपर होत आहे. यासाठी ...

TET exam Confusion at many centers in Kolhapur | टीईटी परीक्षा : कोल्हापुरात अनेक केंद्रावर गोंधळ

टीईटी परीक्षा : कोल्हापुरात अनेक केंद्रावर गोंधळ

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे घेण्यात येत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) आज, रविवारी पेपर होत आहे. यासाठी अनेक केंद्रावर या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, कोल्हापुरातील अनेक परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला आहे. परीक्षार्थ्यांना दोन मिनिटे उशीर झाला म्हणून प्रवेश नाकारण्यात आला आहे. यामुळे परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला.

दसरा चौक येथे असणाऱ्या नेहरु हायस्कूल तसेच विवेकानंद महाविद्यालय, गल्स् हायस्कूल केंद्रावर हा गोंधळ उडाला. यामुळे घटनास्थळी ताबडतोब पोलीस दाखल झाले आहेत. दहा मिनिटांनंतर उशिरा येणाऱ्यांना या परीक्षेस प्रवेश बंद करण्यात येणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे परीक्षार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ग्रामीण भागातील परीक्षार्थ्यांची परीक्षा केंद्रावर दाखल होण्यासाठी मोठा दमछाक झाली.

Web Title: TET exam Confusion at many centers in Kolhapur