वार्षिक तपासणीतच ‘डी.बी.’साठीही चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:24 IST2021-01-20T04:24:35+5:302021-01-20T04:24:35+5:30
पंधरा दिवसांपूर्वी गुन्हे प्रकटीकरण कामाबाबत प्रत्येक पोलीस ठाण्यातील डीबी पथकाच्या कामकाजाबाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी असमाधान व्यक्त केले ...

वार्षिक तपासणीतच ‘डी.बी.’साठीही चाचपणी
पंधरा दिवसांपूर्वी गुन्हे प्रकटीकरण कामाबाबत प्रत्येक पोलीस ठाण्यातील डीबी पथकाच्या कामकाजाबाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी असमाधान व्यक्त केले होते. त्याअनुषंगाने त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाणे वगळता सर्व पोलीस ठाण्यातील डीबी पथके बरखास्त केली होती.
प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत आढावा घेण्यासाठी प्रत्येक वर्षी पोलीस अधीक्षक व उपअधीक्षकांकडून तपासणी होते. त्या अनुषंगाने मंगळवारपासून शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी शहरातील पोलीस ठाण्यांची तपासणी सुरू केली. प्रथम दिवसभरात राजारामपुरी पोलीस ठाण्याची तपासणी केली. प्रत्येक पोलीस ठाण्याची दोन दिवस तपासणी होणार आहे. त्यानंतर लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी याही पोलीस ठाण्यांची तपासणी होणार आहे.
तपासणीत कर्मचाऱ्यांचे सीट रिमार्क तपासले. त्यांनी ठाण्यातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याच्या कामकाजाचा स्वतंत्रपणे आढावा घेतला.