कोल्हापुरातील कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत भीषण अपघात, चौघे गंभीर जखमी
By विश्वास पाटील | Updated: December 8, 2022 17:23 IST2022-12-08T17:22:29+5:302022-12-08T17:23:07+5:30
कोल्हापूर : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये आज, गुरुवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात चौघे जण गंभीर जखमी ...

कोल्हापुरातील कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत भीषण अपघात, चौघे गंभीर जखमी
कोल्हापूर : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये आज, गुरुवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात चौघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना शासकीय रुग्णालयात (सीपीआर) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी तरुणांची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मी टेकडी ते जवाहर साखर कारखाना रोडवर किर्लोस्कर आँईल इंजिन्सच्यासमोर सांगाव फाट्यानजीक मोटरसायकल व कारची धडक होऊन हा अपघात झाला. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकली.
अपघातात चौघे गंभीर जखमी झाले. सोनुकुमार व पंकजकुमार अशी दोघा जखमींची नावे समजली असून त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली. त्यांची नावे समजू शकली नाहीत. या अपघाताची नोंद अद्याप पोलीस ठाण्यात झालेली नाही.