बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात दहा उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:26 IST2021-04-04T04:26:07+5:302021-04-04T04:26:07+5:30
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे सदर ...

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात दहा उमेदवार
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे सदर निवडणुकीच्या रिंगणात आता १० उमेदवार एकमेकांविरुद्ध लढत देण्यासाठी शिल्लक राहिले आहेत.
शिवसेनेचे उमेदवार कृष्णाजी पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य सात उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. परिणामी बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात एकूण १० उमेदवार राहिले असून, त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत : श्रीमती मंगला अंगडी (भाजप), सतीश जारकीहोळी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), विवेकानंद जी. घंटी (कर्नाटक राष्ट्रीय समिती), वेंकटेश्वर महास्वामीजी (हिंदुस्तान जनता पार्टी), सुरेश मरलींगण्णावर (कर्नाटक कार्मीकर पक्ष), आप्पासाहेब कुरणे (अपक्ष), गौतम कांबळे (अपक्ष), निंगाप्पा कळसण्णावर (अपक्ष), शुभम शेळके (अपक्ष समिती) आणि श्रीकांत पडसलगी (अपक्ष).
उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे आहेत: अशोक पांडाप्पा हंजी, हणमंत शिवाप्पा नागनुर, बसवराज डी. हुद्दार, सुरेश बसवंतप्पा परगण्णावर, संगमेश चिक्कनरगुंद, भारती चिक्कनरगुंद, गुरुपुत्र केंपन्ना कुल्लूर आणि कृष्णाजी पुंडलिक पाटील, निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी के. हरीशकुमार यांनी या सर्वांचे माघारी अर्ज स्वीकारले आहेत.