शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

बेळ्गावातील तात्पुरते भाजी मार्केट ५ जूनपासून बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 2:52 PM

मुसळधार पावसामुळे शहरातील बी. एस. येडियुरप्पा मार्गावरील तात्पुरत्या भाजी मार्केटची पार दुर्दशा होत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे शुक्रवार दि. ५ जून पासून सदर मार्केट बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय येथील व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देबेळ्गावातील तात्पुरते भाजी मार्केट ५ जूनपासून बेमुदत बंदव्यापाऱ्यांनी घेतला निर्णय, निवेदन दिले प्रसिद्धीस

बेळगाव :  मुसळधार पावसामुळे शहरातील बी. एस. येडियुरप्पा मार्गावरील तात्पुरत्या भाजी मार्केटची पार दुर्दशा होत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे शुक्रवार दि. ५ जून पासून सदर मार्केट बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय येथील व्यापाऱ्यांनी घेतला आहे.अलीकडेच अवकाळी वादळी पावसामुळे बी. एस. येडियुरप्पा मार्गावरील तात्पुरते भाजी मार्केट भुईसपाट झाले होते. त्यावेळी येथील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याबरोबरच वादळी वाऱ्यामुळे उडालेले पत्रे लागून दोन कामगार गंभीर जखमी झाले होते.

त्यावेळी या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी आपल्याला अन्यत्र सुरक्षित ठिकाणी भाजी मार्केटची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर आता पुन्हा गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे सदर भाजी मार्केट पार दुर्दशा झाली आहे.मार्केटमध्ये सर्वत्र चिखलाच्या दलदलीचे साम्राज्य निर्माण होऊन पाण्याची तळी साचली आहेत. त्याचप्रमाणे मागील वेळेप्रमाणे भाजीपाला याचेही मोठे नुकसान झाले आहे. वारंवार विनंती करून देखील नुकसानभरपाई दिली जात नाही आणि भाजी मार्केटची अन्यत्र व्यवस्थाही केली जात नाही. यासाठी येथील भाजी व्यापाऱ्यांनी ५ जूनपासून मार्केट बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.कोरोनाच्या साथीमुळे आम्हा व्यापारी बांधवांना सरकारने तात्पुरती मार्केटमध्ये भाजी विक्री व्यवस्था केली आहे. परंतु पावसाळ्यात येथे चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान होते आहे. तसेच जे खरेदीदार भाजी खरेदी करतात त्यांचा भाजीपाला सुध्दा पावसामुळे पूर्ण खराब होऊन,

आम्हा व्यापारीवर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आम्ही कित्येक वेळा प्रशासनाला विनंती करून सुद्धा अधिकारीवर्ग आमची दाद घेत नाही. त्यामुळे येत्या शुक्रवार दि.५ जूनपासुन आम्हाला नाईलाजस्तव मार्केट बेमुदत बंद करावे लागत आहे. तरी सर्व व्यापारी व शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, अशा आशयाचे निवेदन त्यांनी दिले आहे.

 

टॅग्स :belgaonबेळगावMarketबाजारkolhapurकोल्हापूर