शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

खड्डे पडलेल्या रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 12:12 PM

अतिवृष्टी आणि महापुरामुळे शहरातील रस्ते खराब झाले आहेत. महापालिका प्रशासनावर सर्वच थरातून ताशेरे ओढले जात आहेत. परिणामी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने करून घेण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले होते. यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून, सोमवार (दि. ४)पासून अखेर पॅचवर्कच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे.

ठळक मुद्देखड्डे पडलेल्या रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टीअखेर पॅचवर्कच्या कामाला मिळाला मुहूर्त

कोल्हापूर : अतिवृष्टी आणि महापुरामुळे शहरातील रस्ते खराब झाले आहेत. महापालिका प्रशासनावर सर्वच थरातून ताशेरे ओढले जात आहेत. परिणामी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने करून घेण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले होते. यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून, सोमवार (दि. ४)पासून अखेर पॅचवर्कच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे.शहरामध्ये असा कोणताही चौक नाही की तेथे खड्डे नाहीत. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना वाहने चालविणे सोडाच, चालणेही जिकिरीचे झाले आहे. विविध पक्ष, संघटनांकडून महापालिकेला धारेवर धरण्यात येत आहे.

यानंतर आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी तातडीची बैठक घेऊन रस्ते त्वरित पॅचवर्क करण्याचे आदेश दिले. सोमवारी विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्येही आयुक्तांनी खराब रस्त्यांवरून अधिकाऱ्यांची खरडपट्टी केल्याचे समजते. यामुळे दुपारनंतर सर्व यंत्रणा कामाला लागली.पॅचवर्कचे काम सुरू केलेले रस्ते

  1. बिंदू चौक ते अयोध्या टॉकीज
  2. संभाजीनगर ते नंगीवली तालीम
  3. उमा टॉकीज परिसर
  4. धैर्यप्रसाद कार्यालय ते पितळी गणपती मंदिर

 

मुदतीपूर्वी खराब झालेल्या रस्त्यांचे गुरुवारपासून पॅचवर्कसततच्या पावसामुळे पॅचवर्कचे काम रखडले होते. बहुतांशी रस्ते ठेकेदाराला दिलेल्या मुदतीपूर्वीच खराब झाले आहेत. संबंधित ठेकेदारांना समज दिली असून, तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारे १८ प्रमुख रस्ते खराब झाले असून, गुरुवार (दि. ७)पासून त्यांचे पॅचवर्क करण्यास सुरू होणार आहे.- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

 

 

पॅचवर्क नको, नव्याने रस्ते करण्याची गरजशहरामध्ये आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये महापूर आला. यामुळे रस्ते खराब झाले. महापालिकेने सध्या पॅचवर्क केले जात आहे. मात्र, काही दिवसाने पुन्हा रस्ते खराब होणार आहेत. तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा नवीनच रस्ते करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहेत.केंद्र, राज्य शासन आता तरी कोल्हापूरकडे लक्ष देणार कायमहापुरामुळे महापालिकेच्या मालमत्तेचे सुमारे ४०० कोटींचे नुकसान झाले आहे. यामध्ये रस्त्यांचाही समावेश आहे. शासनाकडून निधी मिळण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीमध्ये आश्वासनांची खैरात करण्यात आली. त्यामुळे शासनाने आता तरी कोल्हापूरच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे

 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर