कोल्हापूरकरात तापमानाचा पारा किमान १५ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 19:38 IST2020-03-05T19:34:24+5:302020-03-05T19:38:27+5:30
पावसाळ्यात उन्हाळा, हिवाळ्यात पावसाळा अनुभवणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी आता उन्हाळ्यात हिवाळा अनुभवण्याची वेळ आली आहे. किमान तापमान चक्क १६ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने रात्री आणि सकाळी हुडहुडी भरू लागली आहे.

कोल्हापूरकरात तापमानाचा पारा किमान १५ अंशांवर
कोल्हापूर : पावसाळ्यात उन्हाळा, हिवाळ्यात पावसाळा अनुभवणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी आता उन्हाळ्यात हिवाळा अनुभवण्याची वेळ आली आहे. किमान तापमान चक्क १६ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने रात्री आणि सकाळी हुडहुडी भरू लागली आहे.
दिवसभरही गार वाऱ्याची झुळूक अधूनमधून येत असल्याने उन्हाच्या झळाही सुसह्य झाल्या आहे. कोल्हापूरकरांसाठी हे दिवस ठंडा ठंडा-कूल कूल असेच ठरले आहेत.
बदललेल्या वातावरणाचा अनुभव गेले वर्षभर कोल्हापूरकर घेत आहेत. उन्हाच्या झळांनी जीव हैराण होत असतानाच दोन दिवसांपासून अचानकपणे हवेत गारवा तयार झाला आहे. किमान तापमानही १५ ते १६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. कमाल तापमानही ३२ ते ३३ अंश सेल्सिअसवर आले आहे.