शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हाळवणकरांसाठी काय करणार, ते सांगा; खासदार मानेंच्या बैठकीतील कार्यकर्त्याचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 12:19 IST

इचलकरंजी : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यालयात खासदार धैर्यशील माने यांनी घेतलेल्या पहिल्याच बैठकीत एका कार्यकर्त्याने तीव्र भावना व्यक्त ...

इचलकरंजी : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यालयात खासदार धैर्यशील माने यांनी घेतलेल्या पहिल्याच बैठकीत एका कार्यकर्त्याने तीव्र भावना व्यक्त केल्याचा व्हिडीओ दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जाहीर बैठकीत अशा भावना व्यक्त होऊ नयेत, याची खबरदारी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी घेतली होती. त्यातूनही हा प्रकार घडल्याने नेमका हा व्हिडीओ केला कुणी आणि त्याला टॅगलाइन जोडून तो व्हायरल कुणी केला याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू आहे.हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून बरेच दिवस रस्सीखेच सुरू होती. त्यातूनही खासदार माने यांनी बाजी मारत उमेदवारी मिळवली. उमेदवारीची घोषणा होताच इचलकरंजीतील भाजप कार्यालयास त्यांनी पहिल्यांदा भेट दिली. कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्या भाजप कार्यालयातील बैठकीत महेश जाधव यांनी मंडलिक यांचा जाहीर पंचनामा केला. असा प्रकार इचलकरंजीतही होऊ नये, याची दक्षता हाळवणकर यांनी घेतली होती. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मूळ बैठक झाल्यानंतर एखाद्या प्रमुखाचा महत्त्वपूर्ण मुद्दा अथवा प्रश्न असतील, तर ते स्वतंत्र खोलीत मांडावेत, असे नियोजन केले होते. परंतु एका अतिउत्साही कार्यकर्त्याने सभेमध्ये थोडी धुसफूस केलीच. त्यामुळे त्याला खोलीमध्ये बसविण्यात आले. तेथे आल्यानंतर तुमचे म्हणणे मांडा, असे सांगण्यात आले. बैठकीनंतर माने, हाळवणकर खोलीत आल्यानंतर त्या कार्यकर्त्याने हाळवणकर यांना विधानसभेला निवडून आणण्यासाठी तुम्ही काय करणार, हे पहिले सांगा, असे म्हणत आवाज चढविला. त्यावर हाळवणकर यांनीच या कार्यकर्त्याला रोखले. प्रसंगावधान राखत अन्य कार्यकर्त्यांनी त्याला बाजूला नेले. हा प्रकार कोणीतरी मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ विरोधकांच्या हाताला लागताच त्याला पहिल्याच बैठकीमध्ये माने यांना घरचा आहेर, अशी टॅगलाइन जोडून तो व्हायरल झाला.शहर अध्यक्षांची टाळाटाळयाबाबत खात्री करण्यासाठी भाजप शहर अध्यक्ष अमृत भोसले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन घेण्यास टाळाटाळ केली. अन्य पदाधिकाऱ्यांनी तांत्रिक उत्तरे दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाdhairyasheel maneधैर्यशील मानेSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकर