शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या प्रश्नावरून कलगीतुरा !

By admin | Updated: November 30, 2014 23:57 IST

गडहिंग्लज पं. स. सभा : आरोग्य खात्यावर जोरदार चर्चा

गडहिंग्लज : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी राहण्याच्या बंधनकारक अटीच्या मुद्यावरून सत्ताधारी सदस्य अमर चव्हाण व विरोधी सदस्य बाळेश नाईक यांच्यात कलगीतुरा झाला. उपजिल्हा रूग्णालय कामकाजासह मुंगूरवाडी व हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुद्यावर आरोग्य खात्याच्या कारभारावर चर्चा झाली.सभापती अनुसया सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत विविध खात्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. सहा. गटविकास अधिकारी प्रदीप जगदाळे यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याच्या अटीचा फतवा अन्यायकारक असून तो मागे घ्यावा यासाठी आंदोलन करण्याऱ्या शिक्षकांना पाठिंबा द्यावा, अशी सूचना नाईकांनी केली. मात्र, जि. प. शाळेतील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. शाळांच्या भवितव्यासाठी शिक्षकांनी मुख्यालयीच राहणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत चव्हाण यांनी मांडले. राज्यात डेंग्यू व गॅस्ट्रोच्या साथीचे थैमान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चंदगड व आजऱ्यात बैठका झाल्या. मात्र, आपल्या तालुक्यात बैठक झाली नाही. मागणी करूनही बैठक झाली नाही. आरोग्य खात्याची संयुक्त बैठक ताबडतोब बोलवा, अशी आग्रही सूचनाही नाईकांनी केली.मुंगूरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रश्नाकडे अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. नेसरी ग्रामीण आरोग्य केंद्राला चांगला डॉक्टर मिळाल्यामुळे समाधानकारक काम सुरू आहे. परंतु, नेमणूक होवूनदेखील सोनोग्राफीतज्ज्ञ अजून हजर झाले नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली. उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रश्नासह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी नाईक यांनी केली. चर्चेत उपसभापती तानाजी कांबळे, इकबाल काझी यांनीही भाग घेतला. (प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांची मुले जि. प. शाळेत येणार का ?शिक्षकांच्या प्रश्नावरूनच दोघांची जुगलबंदी रंगली. प्राथमिक शिक्षकांची मुले जि. प. शाळेत घातली पाहिजेत. मग जि.प.च्या अन्य विभागाकडील कर्मचाऱ्यांची मुले बाहेरच्या शाळेत कशी? त्यांची मुलेही जि.प.च्या शाळेत आली पाहिजेत, अशी आग्रही सूचना नाईकांनी मांडली. हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या ७/८ वर्षांपासून कायमस्वरूपी डॉक्टर नाही. अनेकवेळा चर्चा झाली, ठराव झाले. मात्र, डॉक्टर मिळत नाही. सभापतींच्या मतदारसंघातच डॉक्टर नाही. आता शासनाच्या दारात बसूया, अशी सूचनाही नाईकांनी केली.