शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

आमदारकीसाठी शिक्षकांची मोर्चेबांधणी शिक्षक आमदार

By admin | Updated: May 24, 2014 01:00 IST

मतदारसंघ निवडणूक : सातजण रिंगणात; गाठीभेटी सुरू

 कोल्हापूर : शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ), शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ, मौनी विद्यापीठ अशा शैक्षणिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सात जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. महिनाभर आधीच संबंधित निवडणूक जाहीर झाल्यामुळे अधिकृतपणे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच या इच्छुकांनी मतदार आणि पाठिंबा मिळविण्यासाठी शैक्षणिक संस्था, संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या वैयक्तिक भेटीगाठींचा वेग वाढविला आहे. या निवडणुकीसाठी विद्यमान शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानुसार या मतदारसंघातून दुसर्‍यांदा प्रतिनिधीत्व करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची राज्यातील ताकदवार संघटना समजल्या जाणार्‍या ‘टीडीएफ’कडून चार जणांनी नावे जाहीर केली आहेत. त्यात सातार्‍यातील दशरथ सगरे, बारामतीमधील गणपत तावरे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व पंढरपूरचे सुभाष माने आणि कराडचे डॉ. मोहन राजमाने. यातील तावरे हे गजेंद्र ऐनापुरे यांच्या गटाकडून, तर जयवंत ठाकरे यांच्या गटाद्वारे व रयत शिक्षण संस्था पुरस्कृत उमेदवार म्हणून डॉ. राजमाने यांचे नाव गेल्या दीड महिन्यांपूर्वी ठाकरे आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी कोल्हापूरमधून जाहीर केले आहे. शिक्षक परिषदेकडून दत्ता सावंत हे बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. मौनी विद्यापीठाकडून शिवाजी खांडेकर आणि प्रा. प्रताप देसाई यांच्या नावांची चर्चा आहे. पदवीधर आमदार निवडणुकीप्रमाणे ‘शिक्षक’साठीच्या उमेदवारीबाबत देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अजूनही शांतताच दिसून येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून येत्या दोन-तीन दिवसांत उमेदवार जाहीर होण्याची शकयता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)