शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Kolhapur: शाळेबाहेर बोलवून शिक्षकावर कोयत्याने हल्ला, शिक्षक गंभीर जखमी; कदमवाडीत घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 15:59 IST

विद्यार्थ्याला रागावल्याच्या कारणातून हल्ला झाल्याचा संशय

उद्धव गोडसेकोल्हापूर: कदमवाडी येथे माझी शाळा येथील शिक्षक संजय आनंदा सुतार (वय ४५, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) यांच्यावर चार ते पाच जणांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. आज, सोमवारी (दि. २६) दुपारी एकच्या सुमारास शाळेतलगत असलेल्या गल्लीत ही घटना घडली. या हल्ल्यात शिक्षक संजय सुतार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक संजय सुतार हे कदमवाडीतील सुसंस्कार शिक्षण प्रसारक मंडळाच्या माझी शाळा या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आज दुपारच्या सुमारास शाळेची पंधरा मिनिटांची सुट्टी झाल्यानंतर शिक्षक संजय सुतार यांना एका तरुणाने शाळेबाहेर बोलवले. त्यावेळी चार ते पाच तरुणांनी सुतार यांच्यावर कोयत्याने वार केले, तसेच डोक्यात दगड घातला.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सुतार रस्त्यावर कोसळताच खाल्लेखोर घटनास्थळावरून पळाले. परिसरातील नागरिकांनी जखमी सुतार यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असून, पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. शिक्षकावर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.शाळेत सातवीत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याला रागावल्याच्या कारणातून संबंधित विद्यार्थ्यांच्या मोठ्या भावाने मित्रांसोबत संजय सुतार यांच्यावर हल्ला केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असून, काही विद्यार्थ्यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकPoliceपोलिस