शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

‘बांधकामसाठी’च रस्सीखेच !

By admin | Updated: December 19, 2014 23:32 IST

गडहिंग्लज नगरपालिका : सभापती निवडी; हसन मुश्रीफ यांचाच निर्णय अंतिम

राम मगदूम- गडहिंग्लज नगरपालिकेत विषय समित्यांच्या निवडीत बांधकाम सभापतीसाठीच रस्सीखेच आहे. पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता असून सभापती निवडीचे सर्वाधिकार आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडेच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून निवडीच्या दिवशी (सोमवारी) बंद पाकिटातून नावे येतील व सभागृहात त्यावर शिक्कामोर्तब होईल.पालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीचे ९, विरोधी जनता दलाचे ७ व जनसुराज्य शक्ती पक्षाचा १ नगरसेवक आहे. बहुमतामुळे सर्व समित्यांची सभापतिपदे राष्ट्रवादीकडेच आहेत. विरोधी आघाडीकडून निवडून आलेल्या भद्रापूर यांची साथ असल्यामुळे राष्ट्रवादीने त्यांना गतवर्षी बांधकाम सभापतिपद दिले आहे. मात्र, यावर्षी हे महत्त्वाचे पद राष्ट्रवादी पुन्हा आपल्याकडे घेण्याची शक्यता आहे.विरोधी पक्षाला पालिकेत बैठकीसाठी स्वतंत्र कक्ष न मिळाल्याच्या आणि आपली कामे होत नसल्याच्या कारणातून गतवर्षी जनता दलाने सभापती निवडीवर बहिष्कार टाकला होता. यावेळी त्यांची भूमिकादेखील महत्त्वाची राहील. संख्याबळानुसार प्रत्येक समितीत राष्ट्रवादीला ३, तर जनता दलाला २ जागा मिळतात. जनता दल समिती निवडीत सहभागी झाल्यास भद्रापूर यांचे सभापतिपद अबाधित राहू शकते.बांधकाम सभापतिपदासाठी किरण कदम व रामदास कुराडे यांनी फिल्डिंग लावली आहे. भद्रापूर यांच्यासह बरगेदेखील या पदासाठी इच्छुक आहेत. ‘महिला व बालकल्याण’साठी सुंदराबाई बिलावर, मंजूषा कदम व बरगे, तर ‘वाचनालय’साठी कदम व बरगे यांची नावे चर्चेत आहेत.नगरसेवकांच्या कामगिरीची नोंदलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला गडहिंग्लज शहरात मिळालेल्या मतांची नोंद मुश्रीफांनी ठेवली आहे. सभापती निवडीत नगरसेवकांच्या निवडणुकीतील कामगिरीची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे.यापूर्वी यांना मिळाली संधीपहिल्या अडीच वर्षांत मंजूषा कदम यांना नगराध्यक्षपदी, तर उपनगराध्यक्षपदी रामदास कुराडे व सुंदराबाई बिलावर यांना संधी मिळाली. दुसऱ्या टप्प्यात नगराध्यक्षपदी लक्ष्मी घुगरे यांना, तर उपनगराध्यक्षपदी कावेरी चौगुले यांना संधी मिळाली आहे.