शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
4
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
5
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
6
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
7
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
8
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
9
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
10
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
11
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
12
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
13
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
14
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
15
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
16
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
17
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
19
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
20
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक 'बालकामगारांचा’ घाट

By admin | Updated: December 2, 2014 00:49 IST

तांत्रिक शिक्षक संघटनेचा विरोध : पूर्वव्यवसाय अभ्यासक्रम पुनर्रचित करण्याचे काम

प्रदीप शिंदे-कोल्हापूरशालेय विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना जीवनोपयोगी व्यवसायातील शिक्षण देण्यासाठी तंत्रशिक्षण खात्याच्यावतीने पूर्वव्यवसाय अभ्यासक्रमांची सुरुवात झाली. यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. मात्र, तंत्रशिक्षण खात्याच्यावतीने पुनर्रचित अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहे. यामुळे फक्त बालकामगारच घडतील; तसेच लहान वयातच पुढील शिक्षणाचे पंख छाटले जातील, अशी भीती तंत्रशिक्षक व पालकांमधून व्यक्त होत आहे. शालेय शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, या उद्देशाने राज्य शासनाच्यावतीने माध्यमिक शाळांमधून व्यावसायिक अभ्यासक्रम (तंत्र) १९५४ पासून सुरू केला. १९९६ पासून पूर्वव्यावसायिक अभ्यासक्रम चालू करण्यात आला. त्यामध्ये इयत्ता आठवी ते दहावीसाठी हा अभ्यासक्रम लागू करण्यात आला. कार्यानुभव विषयाला पर्याय म्हणून हे बहुकौशल्यावर आधारित उपयुक्त व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्याने अनेक विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची आवड निर्माण झाली. तसेच त्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी या तंत्रशिक्षणाचा उपयोग होऊ लागल्याने मुलांचा कल अभियांत्रिकी शिक्षणाकडे वाढत गेला. मात्र, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत पूर्वव्यवसायांचा नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये नववी व दहावीसाठी हा अभ्यास घेतला आहे. नवीन अभ्यासक्रमात व्ही-२ या विषयामध्ये टर्निंग, मिलिंगचा समाविष्ट केला आहे. त्यामुळे इयत्ता नववी ते दहावीतील विद्यार्थ्यांचा वयोगट पाहता हा अभ्यासक्रम न पेलवणारा आहे. लेथ मशीन व मिलिंग मशीनवर जॉब करून घेणे धोकादायक ठरेल. तसेच इयत्ता नववीमध्ये नव्या अभ्यासक्रमांपैकी व्ही-२, अथवा व्ही-३ विषय निवडल्यास मुलांना त्याच विषयात पुढे शिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यांच्यापुढे पर्याय निवडण्याची संधी राहणार नसल्याने मुलांचे नुकसान होणार आहे; पण या कोर्समुळे फक्त बालकामगारांची निर्मिती होणार आहे, अशी भीती शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे. (पुर्वाध)एनव्हीईक्यूएफ / एनएसक्यूएफ हा अभ्यासक्रम शासकीय कर्मचाऱ्यांकडूनच तयार केलेला आहे. त्यामुळे अभ्यासक्रमांची पुनर्रचना करताना अशासकीय तांत्रिक संघटनेला विचारात घेऊन हा अभ्यासक्रम तयार करावा. पूर्वीप्रमाणेच आठवीपासूनच हा अभ्यासक्रम असावा. अभ्यासक्रम तयार करताना जुन्या अभ्यासक्रमात असणारी साहित्य साधने यांचादेखील नवीन अभ्यासक्रमात उपयोग झाला पाहिजे. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकही कर्मचारी अतिरिक्त होणार नाही याची दक्षता नवीन अभ्यासक्रमात घेतली पाहिजे. - एस. आर. कलागते, सचिव, म. रा. अशासकीय तांत्रिक मा. शिक्षण कर्मचारी महासंघ.तांत्रिक 'बालकामगारांचा’ घाटतांत्रिक शिक्षक संघटनेचा विरोध : पूर्वव्यवसाय अभ्यासक्रम पुनर्रचित करण्याचे काम