शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

सर्व्हरचे स्पीड नसल्याने तलाठी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:55 AM

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आॅनलाईन सातबाऱ्यासाठी दिलेल्या सर्व्हरला स्पीडच नसल्याने करवीर, पन्हाळा, हातकणंगले व राधानगरी तालुक्यांतील तलाठ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकला आहे. त्यांच्याकडून या ठिकाणी दिवसरात्र थांबूनच आॅनलाईन सातबाºयाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिन्याभरात शंभर टक्के आॅनलाईन सातबाºयाचे काम होईल, अशी घोषणा ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आॅनलाईन सातबाऱ्यासाठी दिलेल्या सर्व्हरला स्पीडच नसल्याने करवीर, पन्हाळा, हातकणंगले व राधानगरी तालुक्यांतील तलाठ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकला आहे. त्यांच्याकडून या ठिकाणी दिवसरात्र थांबूनच आॅनलाईन सातबाºयाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिन्याभरात शंभर टक्के आॅनलाईन सातबाºयाचे काम होईल, अशी घोषणा केली आहे; परंतु अद्याप त्यांच्याच जिल्ह्यात ८५ टक्केच काम झाले आहे. आजरा, गगनबावडा व भुदरगड तालुक्यांचे काम १०० टक्के झाले आहे.आॅनलाईन सातबारातील तांत्रिक अडचणींमुळे आॅनलाईन सातबाराचे जिल्ह्याचे उद्दिष्ट अद्याप अपूर्णच राहिले आहे. जिल्ह्यात एप्रिल २०१६ मध्ये आॅनलाईन सातबाराच्या कामाला सुरुवात होेऊन याचवेळी हस्तलिखित सातबारे देण्याचे बंद करण्यात आले. सुरुवातीपासूनच आॅनलाईन सातबाराचा विषय वादात राहिला आहे. ग्रामीण भागातील काही ठिकाणी रेंजची अडचण व सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे वेळेवर नागरिकांना सातबारे उतारे देण्यास वेळ लागत होता.वेळोवेळी सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी राहिल्याने त्याला वरचेवर मुदतवाढ देण्यात आली. १ मे २०१८ रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्टÑ दिनाच्या समारंभात महिन्याभरात आॅनलाईन सातबाºयाचे काम शंभर टक्के पूर्ण होईल, असे जाहीर केले होते; परंतु, अद्याप कोल्हापूर जिल्ह्याचे काम सरासरी ८० टक्क्यांच्या पुढे गेलेले नाही. त्यांच्या जिल्ह्यातच ही स्थिती असून, हे काम कधी पूर्ण होणार, अशी विचारणा होत आहे.सध्या तलाठ्यांना सर्वांत मोठा प्रश्न सतावत आहे, तो म्हणजे सर्व्हरचे ‘स्पीड.’ ग्रामीण भागात सर्व्हरला स्पीड नसल्याने आॅनलाईन सातबाराचे काम करण्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १२ लाखांचा सर्व्हर विकत घेतला असून, त्यातून स्पीड देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे करवीरसह हातकणंगले, राधानगरी व पन्हाळा तालुक्यांतील तलाठ्यांचे आॅनलाईन सातबाºयाचे काम हे जिल्हाधिकारी कार्यालयातूनच सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांपासून येथील तलाठी दिवसरात्र थांबून आॅनलाईन सातबाराचे काम करीत आहेत. तरीही या ठिकाणी त्यांना अडचणी येत आहेत. साप्ताहिक सुट्ट्यांदिवशीही तलाठी तालुक्याच्या कानाकोपºयातून येऊन या ठिकाणी काम करीत आहेत; परंतु अद्यापही अडचणींनी त्यांच्या पिच्छा सोडलेला नाही. तीन महिने होऊनही या चार तालुक्यांचे काम शंभर टक्के झालेले नाही.दीडशे तलाठ्यांचा तळ जिल्हाधिकारी कार्यालयातजिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व्हरला स्पीड उपलब्ध करून दिल्याने ‘करवीर’मधील ६७, हातकणंगलेमधील ३८, पन्हाळा व राधानगरीतील प्रत्येकी २० तलाठी दिवसरात्र या ठिकाणी थांबून आॅनलाईन सातबाराचे काम करीत आहेत. येथील डाटा ‘एनआयसी’कडून कलेक्ट करून तो संबंधित यंत्रणेकडून पाठविण्याचे काम केले जात आहे. शासनाने तालुकास्तरावरच तलाठ्यांना चांगल्या स्पीडचा सर्व्हर उपलब्ध करून दिला असता तर हे काम यापूर्वीच पूर्ण झाले असते, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.तालुका एकूण खाते रिएडिटचे टक्केवारीगावे प्रक्रिया पूर्ण काम पूर्णआजरा ९८ ९८ ९८ १००करवीर १३२ १३२ ९५ ७१.९७कागल ८५ ८५ ७६ ८९.४१गगनबावडा ४२ ४२ ४२ १००गडहिंग्लज ९३ ९३ ८० ८६.०२चंदगड १५५ १५३ ११४ ७३.५५पन्हाळा १२८ १२८ ११९ ९२.९७भुदरगड ११४ ११४ ११४ १००राधानगरी १३१ १३० १०३ ७८.६३शाहूवाडी १४२ १४२ १२२ ८५.९२शिरोळ ५२ ५२ ४५ ८६.५४हातकणंगले ६२ ६२ ३५ ५६.४५१२३४ १२३१ १०४३ ८४.५२