शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

'ईडी'च्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांची पोलिसात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 13:24 IST

चौकशी करत असताना त्यांना शिवीगाळ व अमानुष वागणूक

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी छापे टाकून चौकशी केली, मात्र यादरम्यान त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिलेली वागणूक अमानुष होती. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाचे सहायक संचालक रत्नेशकुमार कर्ण यांच्यासह २२ अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने पोलिस अधीक्षकांकडे केली.ईडीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह दोन शाखांवर छापे टाकले. त्यांना अपेक्षित माहिती अधिकारी व कर्मचारी देत होते. मात्र, कर्मचाऱ्यांचे मोबाइल काढून घेतले, त्यांचा कोणाशीही संपर्क होऊ दिला नाही. कर्मचाऱ्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना कोंडून ठेवले. तब्बल तीस तास त्यांना झोपूही न देता एकसारखी चौकशी सुरू ठेवली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांना मानसिक व शारीरिक धक्का कर्मचाऱ्यांना बसला, त्यातील काही कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. सुनील लाड या कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटकाही आला. तीस कर्मचाऱ्यांना घेऊन चौकशी करत असताना त्यांना शिवीगाळ व अमानुष वागणूक दिली. याला सर्वस्वी ईडीचे सहायक संचालक रत्नेशकुमार कर्ण व त्यांचे इतर अधिकारी जबाबदार असल्याचे युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. याबाबतची तक्रार त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.

राजकीय व्देषापोटीच कारवाईकोल्हापूर जिल्हा बँकेने पारदर्शक कारभाराच्या बळावर सर्वाधिक नफा कमावत असताना संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवला. याबाबत विविध केंद्रीय व राज्य शासनाच्या यंत्रणेकडून प्रमाणपत्रे मिळालेली असताना केवळ राजकीय व्देषातून बँकेची बदनामी सुरू असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliceपोलिसbankबँक