भाजपतर्फे चिनी वस्तूंची प्रतीकात्मक होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 18:32 IST2020-06-24T18:28:55+5:302020-06-24T18:32:29+5:30
संपूर्ण जगाला कोरोनाच्या महामारीत ढकलणाऱ्या आणि साम्राज्यविस्ताराचे डोहाळे लागलेल्या चीनचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे चिनी वस्तूंची होळी करण्यात आली.

भाजपतर्फे चिनी वस्तूंची प्रतीकात्मक होळी
ठळक मुद्देभाजपतर्फे चिनी वस्तूंची प्रतीकात्मक होळीचीनचा निषेध, घोषणा
कोल्हापूर : संपूर्ण जगाला कोरोनाच्या महामारीत ढकलणाऱ्या आणि साम्राज्यविस्ताराचे डोहाळे लागलेल्या चीनचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे चिनी वस्तूंची होळी करण्यात आली.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, हेमंत कांदेकर, राजू मोरे, इंद्रजित शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भारताच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. रूपेश खांडेकर, भगवान पाटील, चिंटू जमादार, अनिरुद्ध कुलकर्णी, समीर दिवेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.