शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

शपथ घेऊन लाचेची मागणी, वर्षात ३० गुन्हे, महिन्यात दोन ट्रॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:58 PM

लाच देणार नाही, घेणार नाही, शासकीय-निमशासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी शपथ घेणारेच अधिकारी व कर्मचारी लाच घेताना सापडले आहेत.

ठळक मुद्देशपथ घेऊन लाचेची मागणी

एकनाथ पाटीलकोल्हापूर : लाच देणार नाही, घेणार नाही, शासकीय-निमशासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी शपथ घेणारेच अधिकारी व कर्मचारी लाच घेताना सापडले आहेत.

महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, आरटीओ, नगरभूमापन, बँका, रजिस्ट्रार, आदी कार्यालयांत कामाच्या बदली लाच स्वीकारणाऱ्यां अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सन २०१९ मध्ये ३० गुन्हे दाखल करून ४१ जणांना अटक झाली आहे. त्यामध्ये एकालाच शिक्षा लागली आहे. महिन्याला दोन ट्रॅप होत असले, तरी लाचलुचपत विभागाच्या कारवाईमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने अधिकारी, कर्मचारी लाच स्वीकारण्याची भीती बाळगत नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.दरवर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन केले जाते. शहरात रॅलीद्वारे भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनजागृती करीत शासकीय-निमशासकीय कार्यालयात शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ केला जातो, अशा प्रबोधनावर भर दिला जात असताना, एकीकडे कागदपत्रांमध्ये त्रुटी दाखविल्याने किरकोळ कामासाठी नागरिकांना दोन-तीन महिने हेलपाटे मारावे लागतात.

शेवटी वैतागून काम पूर्ण करण्यासाठी ‘साहेब, पैसे घ्या; पण काम करा,’ असे म्हणण्याची वेळ येते. घराची नोंद सातबारा पत्रकी घालण्यासाठी, प्लॉटचे खरेदी व्यवहार नियमित करण्यासाठी मूल्यांकन दाखल्याच्या मोबदल्यात, कार्य मूल्यमापन अहवाल देण्यासाठी, पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीमध्ये सहकार्य करण्यासाठी, वॉरंटवरील अटक टाळण्यासाठी, इंदिरा आवास घरकुल योजनेतून घराचे बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला देण्यासाठी, तर दुकानांचे वजनकाट्यांचे प्रमाणपत्र देण्यासाठी, सातबारा दाखल्यावर नोंदणी किंवा कर्जबोजा नोंद करून देण्यासाठी पैशाची मागणी केली जाते.यांना झाली शिक्षाट्रॅक्स वाहनावर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी आर. टी. ओ. सुपे पोस्ट (चंदगड)चे तत्कालीन सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत बाळासाहेब शिंदे (रा. कोल्हापूर) व त्यांचा खासगी एजंट समीर रवळनाथ शिनोळकर (रा. यशवंतनगर, ता. चंदगड) यांना प्रत्येकी तीन वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.शपथ घेऊन लाच घेणारे अधिकारी, कर्मचारीतलाठी चंद्रकांत मारुती अस्वले, विनोद आप्पासाहेब कांबळे, शिवाजी चंदर कोळी, विजय विष्णु चौगले, क्रांती सुनील सप्रे, सुनील बाबूराव पांढरे, गणेश दत्तात्रय शिंदे, ग्रामसेवक संभा शंकर कांबळे, आण्णाप्पा बाळू कुंभार, एजंट राजेंद्र पोपट कांबळे, गटविकास अधिकारी अरविंद आण्णाप्पा धरणगुत्तीकर, एजंट सुशांत बाजीराव लव्हटे, जयवंत आबाजी तोडकर, लिपिक अनिल महादेव नांद्रे, मंडल अधिकारी विष्णू चंद्रकांत कुंभार, कोतवाल दिगंबर आनंदा गुरव, सीपीआर रुग्णालयाचे भांडारपाल जयवंत शंकर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ सहायक शालन कृष्णात माने, मैल कामगार बाळू आनंदा निकम, मंडल अधिकारी मनोज कौतिक दाभाडे, वीज मंडळ सहायक जीवन महादेव कांबळे, सहायक अभियंता राजेश अनिल घुले, पोलीस पाटील रामचंद्र शिवाजी सपकाळ, डाटा एंट्री आॅपरेटर साताप्पा कृष्णा चौगुले, ग्रामसेवक आनंदा पांडुरंग द्रविड, विस्तार अधिकारी बाळासाहेब मारुती कांबळे, चंदन कोंडिबा कांबळे, वसुली निरीक्षक गणेश विठ्ठल लिगाडे, अनिल बाबासो पाटील, उमेश तुकाराम शिंदे, पोलीस अजीज खुदबुद्दीन मुल्लाणी, विलास शंकर देसाई, राजाराम धोंडिराम पावसकर, सतीश बापुसो खुटावळे, अजीज रमजान शेख, एजंट दाऊद बाबालाल पाटणकर, सरपंच पंडित बापू शेळके, सहायक संचालक बसवराज शांताप्पा मालगट्टी.

लोकांनी निर्भयपणे तक्रार करण्यास पुढे यावे. आम्ही स्वत:हून प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन प्रलंबित प्रकरणांसाठी उंबरे झिजविणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन त्यांना दिलासा देत आहोत; त्यामुळे सध्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे.आदिनाथ बुधवंत, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत विभाग, कोल्हापूर

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणkolhapurकोल्हापूर