शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: पत्नीला माहेरी आणल्याच्या रागातून सासूवर तलवार हल्ला, जावयावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:07 IST

गोकुळ शिरगाव : येथे कौटुंबिक वादातून जावयाने सासूवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. नीलेश कृष्णात तोरस्कर (वय ...

गोकुळ शिरगाव : येथे कौटुंबिक वादातून जावयाने सासूवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. नीलेश कृष्णात तोरस्कर (वय ४०) असे संशयित आरोपीचे नाव असून, मालन शामराव पाटील (६२) असे जखमी सासूचे नाव आहे.मालन पाटील या आपल्या घराच्या दारात बसलेल्या असताना पत्नीला माहेरी आणल्याच्या रागातून नीलेशने त्यांच्यावर तलवारीने वार केले. या हल्ल्यात मालन पाटील डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर नीलेश तोरस्कर घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.संशयित आरोपी नीलेश तोरस्कर याचे पत्नी राधिकासाेबत अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. राधिकाला नीलेश त्रास देत असल्यामुळे तिचा भाऊ दत्तात्रय पाटील यांनी तिला महिन्यापूर्वी माहेरी आणले होते. याचा राग नीलेशच्या डोक्यात होता. दत्तात्रय यांनी नीलेशला सांगितले की, त्याच्या मुलीची दहावीची परीक्षा झाल्यानंतर ते राधिकाला नांदायला पाठवतील. पण नीलेश ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. ताे दत्तात्रय आणि त्यांच्या आईला जिवे मारण्याची सतत धमकी देत होता.मंगळवारी रात्री ९:१५ च्या सुमारास नीलेशने मालन पाटील यांच्यावर तलवारीने हल्ला केला. यात मालन पाटील गंभीर जखमी झाल्या. त्यांना पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. फरार नीलेशचा शोध सुरू असून सपोनि टी. जे. मगदूम या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस