शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जयसिंगपुरात भरदुपारी तरुणावर तलवार हल्ला, आईच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 17:14 IST

घटना सीसीटीव्हीत कैद; तिघांविरुद्ध गुन्हा

जयसिंगपूर : पूर्ववैमनस्यातून शहरातील नांदणी नाका मार्गावर मोटारसायकलीवरुन आलेल्या तिघांनी तरुणावर भरदुपारी तलवारीने हल्ला केला. आईच्या प्रसंगावधानामुळे पुढील मोठा अनर्थ टळला असलातरी या हल्ल्यात सुनील रामाप्पा लमाणी (वय २८, रा.नांदणी नाका, लमाणी वसाहत धरणगुत्ती, ता. शिरोळ) हा जखमी झाला. आत्मरक्षणासाठी महिलेसह त्या तरुणाने दगडफेक सुरू करताच हल्लेखोर पसार झाले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, याप्रकरणी विनोद कासू पवार, अरविंद कासू पवार (दोघे रा. कालीबागतांडा, एलटी विजयपूर), विनोद बाबू जाधव (रा. नांदणी नाका लमाण वसाहत धरणगुत्ती) या तिघांविरुद्ध जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.सुनील लमाणी यांचे वडील लघुशंकेकरिता गेले होते. याच दरम्यान सुनील व त्याची आई वाट पाहत रस्त्यावर थांबले होते. दरम्यान, पाठीमागून तिघे संशयित मोटारसायकलीवरुन आले. संशयित विनोद पवार याने शिवीगाळ करत अचानक सुनील याच्यावर तलवारीने वार केला. याचदरम्यान त्याच्या आईने प्रसंगावधान राखत सुनीलला सावध केले. पाठीवर वार झाल्याने सुनील जखमी झाला. याचदरम्यान आत्मरक्षणासाठी आई व सुनील यांनी संशयितावर दगडफेक केली. त्यानंतर संशयित पसार झाले. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या घटनेची चित्रफित मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पसरल्याने शहरासह परिसरात या घटनेची चर्चा सुरू होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस