शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

शिवाजी विद्यापीठातील ३० प्राध्यापकांना पदोन्नतीची गोड भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 6:12 PM

शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभागांमधील ३० प्राध्यापकांना प्रशासनाने मंगळवारी पदोन्नतीची पत्रे दिली. करिअर अ‍ॅडव्हान्समेंट स्कीमअंतर्गत (कॅस) प्रशासनाकडून पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली. मकरसंक्रांतीच्या दिवशी पदोन्नतीची गोड भेट मिळाल्याने प्राध्यापकांतून आनंद व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठातील ३० प्राध्यापकांना पदोन्नतीची गोड भेटप्रशासनाकडून पत्रे; करिअर अ‍ॅडव्हान्समेंट स्कीमअंतर्गत प्रक्रिया

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभागांमधील ३० प्राध्यापकांना प्रशासनाने मंगळवारी पदोन्नतीची पत्रे दिली. करिअर अ‍ॅडव्हान्समेंट स्कीमअंतर्गत (कॅस) प्रशासनाकडून पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली. मकरसंक्रांतीच्या दिवशी पदोन्नतीची गोड भेट मिळाल्याने प्राध्यापकांतून आनंद व्यक्त होत आहे.महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवरील प्राध्यापकांच्या पदोन्नतीच्या अनुषंगाने कार्यवाही कॅसद्वारे केली जाते. विद्यापीठातील विविध अधिविभागांमधील प्राध्यापकांच्या कॅसअंतर्गत पदोन्नतीची प्रकरणे प्रलंबित होती. पदोन्नतीसाठी पात्र प्राध्यापकांच्या मुलाखतीची प्रक्रिया गेल्या १५ दिवसांपासून प्रशासनातर्फे सुरू होती.

ती पूर्ण झाल्याने मंगळवारी प्रशासनाने ३0 प्राध्यापकांना पदोन्नतीची पत्रे दिली. सन २०१३ मध्ये प्रशासनाने २५ प्राध्यापकांना पदोन्नती दिली होती. त्यानंतर सहा वर्षांनी यंदा प्रशासनाकडून प्राध्यापकांना पदोन्नती देण्यात आली. त्यामध्ये साहाय्यक, सहयोगी प्राध्यापकांचा समावेश आहे. दरम्यान, याबाबत विद्यापीठाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांचा मोबाईल बंद होता. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर