गडहिंग्लजच्या उपसभापतीपदी स्वाभिमानीचे हसुरी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 16:28 IST2020-12-22T16:26:52+5:302020-12-22T16:28:21+5:30
Panchyat Samiti- गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ईराप्पा हसुरी यांची बिनविरोध निवड झाली. तहसिलदार तथा पीठासन अधिकारी दिनेश पारगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड झाली.

गडहिंग्लजच्या उपसभापतीपदी स्वाभिमानीचे हसुरी बिनविरोध
गडहिंग्लज : गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ईराप्पा हसुरी यांची बिनविरोध निवड झाली. तहसिलदार तथा पीठासन अधिकारी दिनेश पारगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड झाली.
राष्ट्रवादीच्या उपसभापती श्रीया कोणकेरी यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. राष्ट्रवादी, काँगे्रस व स्थानिक ताराराणी आघाडी पुरस्कृत सत्ताधारी गडहिंग्लज विकास आघाडीने हसुरी यांना संधी दिली. त्यांच्या रूपाने स्वाभिमानीला हा बहुमान पहिल्यांदाच मिळाला.
सभेला सभापती रूपाली कांबळे, विजयराव पाटील, विद्याधर गुरबे, बनश्री चौगुले, श्रीया कोणकेरी व इंदूमती नाईक उपस्थित होते. भाजपाच्या तीनही सदस्यांनी निवडीकडे पाठ फिरवली.
यावेळी जि. प. सदस्या रेखाताई हत्तरकी, स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, वरदशंकर वरदापगोळ उपस्थित होते.