कोल्हापूर : गोवा व कोल्हापूर येथील स्टील उत्पादन करणाऱ्या कारखान्यासाठी आवश्यक असणारे स्क्रॅप हे रोख रक्कम देऊन खरेदी केले गेले असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली आहे. मिळालेले स्क्रॅप व त्यातून तयार केलेले स्टील उत्पादन यामध्ये तफावत असल्याचे तपासात आढळून आल्याचे समजते.गोवा येथील प्रसिद्ध स्टील उद्योग समूहाच्या संचालकांच्या गोवा, महाराष्ट्र व उत्तर प्रदेश येथील कारखाना, निवासस्थान व कार्यालय आदी ठिकाणी टाकलेल्या आयकर छाप्यामध्ये बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आल्याचे समजते. कोल्हापुरातील कारवाईत एक कोटीहून अधिक रक्कम तसेच पाव किलोहून अधिक सोने जप्त करण्यात आल्याचे समजते. गोवा कोल्हापूर व उत्तर प्रदेश येथील कारवाई अजून सुरूच असून, काही संशयास्पद कागदपत्रे आयकर विभागाने ताब्यात घेतली आहेत.या उद्योग समूहाचे प्रमुख हे मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. पंधरा वर्षांपूर्वी ते कोल्हापूर येथे स्थायिक झाले. याच काळात त्यांनी गोवा येथे स्टील उत्पादनाचा कारखाना उभारला. स्टीलचे उत्पादन करण्यासाठी आवश्यक कच्चा माल म्हणून स्क्रॅपची खरेदी केली जाते. या स्क्रॅपची खरेदी रोखीने केल्यामुळे अनेक व्यवहारांमध्ये हिशोबाची कागदपत्रे आढळत नाहीत.काही कागदपत्रांमध्ये तफावत आढळून येते. त्यामुळे आयकर विभागाने संबंधित संचालकांचे जबाब घेण्याचे काम सुरू केल्याचे समजते. या कारवाईत आयकर विभागाने संबंधित उद्योग समूहाच्या गेल्या सहा वर्षांतील अकाउंट्सची माहिती घेण्यास सुरुवात केल्याचे समजते.
वर्षभरापूर्वी जीएसटी विभागाची कारवाईयाच स्टील उद्योग समूहाने जीएसटी कर चुकवेगिरी केल्याचे निदर्शनास आल्यामुळे वर्षभरापूर्वी जीएसटी विभागाने या उद्योग समूहावर दंडात्मक कारवाई केली होती. यावेळी जीएसटी विभागालाही कागदपत्रांचा ताळमेळ लागला नव्हता.
Web Summary : Income Tax raids on a Kolhapur-based steel businessman revealed discrepancies in scrap purchases. Unaccounted assets, including cash and gold, were seized. Investigations continue in Goa, Maharashtra, and Uttar Pradesh, focusing on six years of accounts and GST evasion.
Web Summary : कोल्हापुर स्थित स्टील व्यवसायी के स्क्रैप खरीद में विसंगतियां मिलीं। नकदी और सोने सहित बेहिसाब संपत्ति जब्त। गोवा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश में जांच जारी, छह साल के खातों और जीएसटी चोरी पर ध्यान केंद्रित।