डिगसच्या पोलीस पाटलांचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:39+5:302021-02-05T07:07:39+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रूपेश पाटील हे रविवारी राधानगरी येथे गेले होते. रात्री उशिरापर्यंत न आल्याने त्यांचे वडील तुकाराम ...

Suspicious death of Diggs police patrol | डिगसच्या पोलीस पाटलांचा संशयास्पद मृत्यू

डिगसच्या पोलीस पाटलांचा संशयास्पद मृत्यू

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रूपेश पाटील हे रविवारी राधानगरी येथे गेले होते. रात्री उशिरापर्यंत न आल्याने त्यांचे वडील तुकाराम पाटील यांनी त्यांना फोन केला असता मी राधानगरीत आहे, आता यायची सोय नसल्याने मी सकाळी येतो असे त्यांनी सांगितले होते. मात्र, पहाटे पाच वाजता घराशेजारी दाजीपूर-कारीवडे रस्त्याकडेला ते निपचित पडल्याचे आढळले. खासगी वाहनातून त्यांना राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले; मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रूपेश पाटील यांची दोन वर्षांपूर्वीच पोलीस पाटील म्हणून निवड झाली होती. यासाठी त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता.

टिप-फोटो स्वतंत्र पणे कोलडेस्क वर पाठवला आहे

Web Title: Suspicious death of Diggs police patrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.