शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘दौलत’ साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेस स्थगिती, थकबाकी वसुली प्राधिकरणाचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:48 IST

जिल्हा बँकेच्या प्रयत्नाला यश

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ई-लिलावाद्वारे होणाऱ्या विक्री प्रक्रियेस स्थगिती मिळाली आहे. दिल्लीतील थकबाकी वसुली प्राधिकरणाने (डीआरटी) सोमवारी आदेश दिला.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीच्या वसुलीपोटी ‘दौलत’ कारखाना ३९ वर्षांच्या मुदतीने ‘लिव्ह अँड लायसन्स’ या भाडेतत्त्वावर जिल्हा बँकेसह इतर सर्व वैधानिक देणी १६२ कोटी ही अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने देण्याच्या अटीवर चालवावयास दिला. याबाबत बँक, कंपनी व ‘दौलत’ कारखाना व्यवस्थापन यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार झाला होता.            या भाडेकरारात नमूद केलेल्या वैधानिक देण्यांपैकी साखर विकास निधी (एसडीएफ)ची देय १८.०८ कोटी व त्यावरील व्याजासह होणाऱ्या रकमेच्या वसुलीसाठी राष्ट्रीय सहकार विकास प्राधिकरणाने (एनसीडीसी) हा कारखाना ई-लिलाव पद्धतीने विक्री करण्याची निविदा २३ ऑगस्टला काढली. त्यानुसार गुरुवारी (दि. ९) लिलाव होता, या लिलाव प्रक्रियेला स्थगिती मिळावी म्हणून ‘अथर्व’ कंपनीने दिल्लीतील थकबाकी वसुली लवाद -डीआरटी कोर्टामध्ये अपील केली होती. या अपिलामध्ये बँकेच्यावतीने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. प्रीती भट्ट यांनी बाजू मांडली. अवलोकनानंतर डीआरटी न्यायालयाने केडीसीसी बँकेने ‘दौलत’ कारखाना चालवण्याबाबत केलेला भाडेकरार हा योग्य असल्याचे नमूद केले. तसेच बँकेने सिक्युरिटायझेशन ॲक्ट-२००२ अंतर्गत राबविलेली प्रक्रिया योग्य असल्याचेही निरीक्षण नोंदविले. तसेच कारखान्याचा हा भाडेकरार एनसीडीसीला ज्ञात होता, असे नमूद करतानाच कोर्टाने तब्बल सहा वर्षांनंतर ही बाब उपस्थित करता येणार नाही, हा करार रद्द करण्याचा अधिकार वसुली अधिकाऱ्यांना नाही, तो दिवाणी न्यायालयाला आहे. असेही न्यायालयाने नमूद केल्याचे बँकेने पत्रकात म्हटले आहे.जिल्हा बँकेच्या प्रयत्नाला यशजिल्हा बँकेच्या सभेत ‘दौलत’चा विषय आल्यानंतर थकीत रक्कम ‘अथर्व’ भरेल, त्यांनी भरले तर बँक भरेल; पण कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहील, असे बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांनी सभासदांना विश्वास दिला होता. त्यानुसार बँकेने न्यायालयीन पातळीवर विशेष प्रयत्न केल्याचे पत्रकात म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Stay on 'Daulat' sugar factory sale; recovery authority order.

Web Summary : The Debt Recovery Tribunal (DRT) stayed the e-auction sale of Daulat sugar factory due to recovery dues. A three-party lease agreement existed. 'Atharva' company appealed, and the court acknowledged the lease's validity, preventing the sale. The bank assured farmers of the factory's ownership.