कोल्हापूर : कोल्हापुरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर लघुशंकेसाठी जातो म्हणून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोक्सो प्रकरणातील संशयित पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. रोहित उर्फ गणेश गुंडाजी नंदीवाले (वय २२, रा. कोथळी, ता. शिरोळ) असे त्याचे नाव आहे. सहा दिवसांपूर्वी ही घटना घडूनही पोलिसांनी सोमवारी रात्री या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने ऊलटसुलट चर्चा सुरु आहे. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.कुडित्रे फॅक्टरी (ता. करवीर) जवळील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी करवीर पोलिसांनी १५ मे रोजी संशयित नंदीवाले याला ताब्यात घेतले होते. त्याच दिवशी त्याला सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास त्याला आणि दुसरा आरोपी शामराव सुतार या दोघांची वैद्यकीय तपासणी होती. सुतार हा अंपग असल्याने त्याला उचलून एक्सरे काढण्यासाठी बंदोबस्तासाठी असलेले पोलिस नेत होते. त्या वेळी नंदीवाले याने लघुशंका आल्याचे कारण देऊन तेथून पसार झाला.
Kolhapur Crime: सीपीआरमधून पोलिसांच्या तावडीतून पोक्सो प्रकरणातील संशयित पळाला, शोध सुरु
By सचिन यादव | Updated: May 20, 2025 13:50 IST