शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणाचे सर्वेक्षण युद्धपातळीवर

By admin | Updated: October 3, 2015 01:20 IST

कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग : कोल्हापूर, बांबवडे, मलकापूर, शाहूवाडीतून बायपास

भीमगोंडा देसाई / कोल्हापूर कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी चार पथकांतर्फे सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम आराखडा होईल. त्यानंतर जमीन संपादनानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. चौपदरीकरण करताना कोल्हापूर, बांबवडे, मलकापूर, शाहूवाडीतून बायपास रस्ता होणार आहे. चौपदरीकरणानंतर टोल लागणार की नाही, यासंबंधी अजून स्पष्ट झालेले नाही; पण या कामावर दोन हजार कोटींपेक्षा अधिक निधी खर्च होणार असल्यामुळे टोल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोल्हापूर-रत्नागिरी रस्ता १३७ किलोमीटरचा आहे. सध्या या रस्त्यावर प्रचंड वाहतूक वाढली आहे. कोकणात जाणारा हा मुख्य मार्ग असल्यामुळे दिवसेंदिवस वाहतुकीत भरच पडत आहे. सध्याचा रस्ता अरुंद वाटत आहे. अनेक ठिकाणी दोन अवजड वाहने एकमेकांसमोर आल्यानंतर वाहतुकीची कोंडी होते. अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. यामुळे येथील राष्ट्रीय महामार्ग (विभाग क्रमांक सात) या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव भारतीय भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाकडे पाठविला आहे. त्याला तत्त्वत: मान्यता मिळाली असून, सर्व्हेचे कामही सुरू झाले आहे. सर्व्हेचा अहवाल आल्यानंतर चौपदरीकरणात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या संमतीसाठी बैठका होणार आहेत. यास कमीत कमी विरोध होईल, असा रस्त्याचा अंतिम आराखडा तयार करण्यात येणार आहे. रस्त्यावर कोल्हापूर, बांबवडे, मलकापूर, शाहूवाडी ही शहरे आहेत. चौपदरीकरण या शहरांतून झाल्यास मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे बायपास रस्ता करण्याचे नियोजन आहे. तसेच या मार्गावर १२ किलोमीटर लांबीचा आंबा घाट आहे. या घाटातून सध्या असलेला रस्ता कायम ठेवण्यात येणार असून, नवीन पर्यायी रस्ता तयार करताना तीव्र चढ आणि उतार कमी करण्यासाठी काही ठिकाणी बोगदे तयार केले जातील. चौपदरीकरणानंतर रस्ता किती रुंद ? राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे रस्ता वन-वे होणार आहे. चार मीटर रुंदीचा दुभाजक असेल. दोन्ही बाजूला प्रत्येकी सात मीटर रस्ता रुंद होईल. यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून, वाहतुकीची कोंडी फुटणार आहे.