दुसऱ्या दिवशी सुर्यकिरणे अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 19:09 IST2020-11-09T19:06:49+5:302020-11-09T19:09:10+5:30

कोल्हापुरातील श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात सोमवारी सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी सुर्यकिरणे देवीच्या मुर्तीच्या गुडघ्यापर्यंत आली. थंडीचे दिवस आणि ढगाळ वातावरणामुळे सुर्यकिरणांची तीव्रता कमी होती.

Sunbeams up to Ambabai's knees - Second day of radiation festival: | दुसऱ्या दिवशी सुर्यकिरणे अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंत

कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात सोमवारी किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत आली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशी सुर्यकिरणे अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंततुलनेने किरणोत्सवाचा दुसऱ्या दिवशी किरणांची तीव्रता चांगली

कोल्हापूर : कोल्हापुरातील श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात सोमवारी सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी सुर्यकिरणे देवीच्या मुर्तीच्या गुडघ्यापर्यंत आली. थंडीचे दिवस आणि ढगाळ वातावरणामुळे सुर्यकिरणांची तीव्रता कमी होती.

श्री अंबाबाई मंदिरात वर्षातून दोनदा किरणोत्सव सोहळा होता. या वर्षातील दुसरा किरणोत्सव रविवारपासून सुरु झाला. पहिल्या दिवशी किरणे पितळी उंबऱ्यापर्यंत येवून लुप्त झाली. तुलनेने सोमवारी किरणांची तीव्रता चांगली होती.

सायंकाळी पाच वाजता किरणे महाद्वार कमानीजवळ आली येथून गरुड मंडप, कासव चौक, पितळी उंबरा, कटांजन असा प्रवास करत किरणांनी ५ वाजून ४५ मिनिटांनी मूर्तीचा चरणस्पर्श केला. येथे एक मिनिट स्थिरावल्यानंतर ५ वाजून ४७ व्या मिनिटांला गुडघ्यापर्यंत आली. गुडघ्यावर एक मिनिट स्थिरावल्यानंतर किरणे डावीकडे लुप्त झाली.


 

Web Title: Sunbeams up to Ambabai's knees - Second day of radiation festival:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.