शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

बँकांच्या वसुलीच्या तगाद्यामुळेच ‘त्या’ सख्ख्या भावांची आत्महत्या

By admin | Updated: April 4, 2017 23:12 IST

६० लाखांवर कर्ज; १६ तासानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

वडगाव हवेली : कर्जाला कंटाळून धाकट्या भावाने विष प्राशन केल्यानंतर मोठ्या भावानेही रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. विद्यानगर व टेंभू येथे सोमवारी रात्री तासाच्या फरकात या घटना घटल्या. दोघांवर बँकांचे साठ लाखांहून अधिक कर्ज असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट होत आहे. बँकांच्या वसुलीच्या तगाद्यामुळेच या भावांनी आत्महत्या केल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. प्रशासनाच्या आश्वासनानंतर १६ तासांनी नातेवाइकांनी ते ताब्यात घेतले.जगन्नाथ कृष्णा चव्हाण (वय ४०) व विजय कृष्णा चव्हाण (३३) अशी आत्महत्या केलेल्या भावांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव हवेली येथील जगन्नाथ व विजय यांनी काही वर्षांपूर्वी शेतीसाठीवसाहतीत सुरू केली. या सर्व शेतीपूरक व्यवसायासाठी त्यांनी दोन बँकांकडून कर्ज घेतले होते. सुरुवातीला त्यांनी त्या कर्जाच्या रकमेची वेळेत परतफेड केली. मात्र, कालांतराने कृषी दुकान व अ‍ॅग्रो कंपनी डबघाईस आली. या दोन्हीतून नफा मिळत नव्हता. त्यामुळे व्यापाऱ्यांची देणी, बँकांचे कर्ज, दुकानांचा नफा व शेतीचा खर्च याचा या बंधूंना ताळमेळ जुळवता आला नाही. परिणामी, हे दोन्ही बंधू कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले. दिवसेंदिवस कर्जाचा व त्यावरील व्याजाचा आकडा वाढत गेला. कर्जाच्या रकमेची वेळेत परतफेड होत नसल्याने बँकांकडून जगन्नाथ व विजय यांच्या नावे नोटीसही पाठविण्यात आल्या होत्या. मार्च महिना सुरू झाल्यापासून हे दोन्ही बंधू तणावाखाली होते. कर्ज रकमेच्या परतफेडीसाठी बँकांकडून सुरू असणारा तगादा व व्यापाऱ्यांचे फोन यामुळे हे बंधू दिवसेंदिवस नैराश्यात जात होते. अशातच गत आठवड्यापासून पैशासाठी त्यांच्यावर ताण आला होता. सोमवारी सकाळी विजय नेहमीप्रमाणे ओगलेवाडी येथील कृषी दुकानात, तर जगन्नाथ हे कडेगाव येथे अ‍ॅग्रो कंपनीत गेले. दरम्यान, रात्री सात वाजण्याच्या सुमारास विजय यांनी दुकानाचे एक शटर बंद करून आतच विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर मेहुण्याला फोन करून त्यांनी याबाबतची कल्पना दिली. मेहुण्याने ओगलेवाडीतील काही मित्रांना फोन करून विजय यांच्या दुकानात जाण्यास सांगितले. संबंधित मित्र दुकानात गेले असता विजयने विषारी औषध प्राशन केल्याचे व ते निपचित पडल्याचे दिसून आले. त्यामुळे मित्रांनी तातडीने त्यांना कृष्णा रुग्णालयात हलवले. काहीजणांनी त्वरित फोन करून याबाबतची माहिती जगन्नाथ यांना दिली. विजयने औषध प्राशन केल्याची व त्यामध्येच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जगन्नाथ अस्वस्थ झाले असावेत. कडेगावमधून निघाल्यानंतर ते तातडीने रुग्णालयात येतील, अशी नातेवाइकांना अपेक्षा होती. मात्र, जगन्नाथ हे टेंभूमध्ये गेले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी रेल्वेखाली स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर काही नातेवाईक व ग्रामस्थ टेंभू येथे गेले. तसेच पोलिसही त्याठिकाणी पोहोचले. जगन्नाथ यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर विजय यांचा मृतदेहही कृष्णा रुग्णालयातून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबतची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे.